Thursday, April 9, 2020

गृहिणी

फेसबुक वरील आवडलेली पोस्ट

" ताटातलं वाटीतच राहील "  आमच्याकडे ही पारंपारीक पद्धत आहे 

1. दुधाच्या पिशव्या घरात घ्यायच्या, त्याच बरोबर त्या पिशव्यांसाठी बाहेर लटकवलेली पिशवी पण घरात  घ्यायची (कारण दाराबाहेर ती खराब दिसते! )  
2. दूध तापवून घ्यायचं 
3. कालच्या दुधावरची साय काढून वेगळ्या भांड्यात जमा करायची 
4. कालचं दूध वेगळं तापवायचं 
5. चहा करायचा  
6. मधुमेही सदस्यांसाठी वेगळा चहा बनवायचा  
7. गाळणी मधून चहापत्ती काढून कुंडीतील तुळशीला  घालायची 
8. दुधाच्या पिशव्या धुवून किचनमधील टाईलवर सुखवायला चिकटवून टाकायच्या 
9.  कुटुंबियांना चहा द्यायचा
10.  मुलाबाळांना झोपेतून प्रेमाने उठवायचा प्रयत्न करायचा 
11. त्यांना दूध द्यायचं, बोर्नव्हिटा किंवा तत्सम त्या दुधात मिसळायला विसरायचं नाही !
12. सासू, सासरे, नणंदा, दीर (असतील तर) आणि पती यांची औषधं काढून ठेवायची 
13. चहाचे कप विसळायचे 
14. नाश्त्याच्या आणि दुपारच्या डब्यांकरतां स्वयंपाक बनवायची तयारी चालू करायची 
15. कालच्या दुधाला विरजण लावायला विसरायचा नाही !
16. मुलांचे युनिफॉर्म्स त्यांना द्यायचे, कारण, कपाटात समोर असलेल्या गोष्टी त्यांना दिसत नाहीत ! 
17. मुलांची सकूलबॅग भरायला मदत करायची 
18.  मुलांची परीक्षा कोणती आणि कधी आहे हे डोक्यात ठेवून त्याप्रमाणे त्यांची पुस्तके आणि डबे भरून द्यायचे 
19 . मुलांचा एखादा प्रोजेक्ट अर्धवट राहिला असेल तर त्यात त्यांना थोडीशी मदत करायची 
20. मधेच नवरा बाथरूम मधून प्रेमळ आवाजात "बोंबलतो" ----  " अगं माझा टॉवेल दे ", न चिडता त्याला टॉवेल नेऊन द्यायचा 
21. कचरा नेणारा  सफाई कामगार बेल वाजवतो, पटकन आपले कचरा भांडे घराबाहेर द्यायचे, ते परत घरात घेऊन त्यात गार्बेज बॅग लावायची  
22. पेपरवाला बेल वाजवतो, पटकन ते घ्यायचे कारण, सासर्यांना किंवा नवऱ्याला ते वाचायची घाई झालेली असते 
23. शाळेची बस यायच्याआधी मुलांच्या पाप्या घेऊन त्यांना खाली रस्त्यावर सोडायला जायचं 
24. स्वतःचं आवरताना बाथरूम मध्ये पटकन बेसीन आणि टाईल्स वर स्वच्छतेचा हात फिरवायचा 
25. ओटा आवरायचं आणि पुसायचचं काम तर अगदी मस्ट  
26. नाश्ता आणि डबे बनवताना घरात काय संपलाय, शिधा / भाजी काय आणायला लागणार आहे याची नोंद डोक्यात ठेवायची 
27. भांडीवाली यायच्या आधी काचेची भांडी धुवून / घासून ठेवायची 
28. काल वाळत घातलेले कपडे तारेवरून काढून घ्यायचे 
29. आजचे वॉशिंग मशीन लावायचे 
30. पायपुसणी बदलायची 
31. बाथरूम मधले टॉवेल बदलायचे 
32. बाथरूम मधल्या आरशांवरच्या टिकल्या काढायचा प्रयत्न करायचा 
33. झाडू पोछावाल्या आणि भांडी घासणाऱ्या बाईंकरता सुयोग्य परिस्थिती निर्माण करून ठेवायची 
हुश्शशशश ........ 

सकाळी दोन तासात ही कमीतकमी ३3 कामं (ती सुद्धा मल्टिटास्क) करायची म्हणजे काय खायची गोष्ट नाहीये ! प्रत्येक टास्कला तीन मिनिट्स आणि सहा सेकन्द्स मिळतात) सुट्टी नाही ! कोण करतं असं ? वेगळा पगार मिळालाच पाहिजे, अरे या हार्डकोअर प्रांजळ गृहिणी वेगळा पगार घेऊन काय करणार ? " ताटातलं वाटीतच राहील "

No comments:

Post a Comment