मोहम्मद अली जिना ह्यांचे वडील जन्माने हिंदू होते त्याबद्दल अधिक माहिती मिळेल का?
बॅरिस्टर जिनाह हे पूर्वाश्रमीचे हिंदू होते आणि ब्रिटनिया चे मालक नसली वाडिया (धर्माने पारसी)आणि टाटा उद्यगसमूहाचे अध्यक्ष टाटा याचे पण जवळचे नातलग होते.
बॅरिस्टर जिना हे गुजरात मधल्या कठियावडी भागातले आणि मुख्यतः त्यांची मातृभाषा गुजराती होती.त्यांचे आजोबा प्रेमजी ठक्कर हे हिंदू होते आणि जातीने लोहना (वैश्य एक प्रकारचे)या जातीचे हिते.त्यांच्या जाती मध्ये शाकाहारी चा पाळन करता होतें.प्रेमजी ठक्कर यांनी मत्स्यपालन मधून खूप पैसे कमावला.पण त्यांच्या जमातीला हा धंदा पसंद नव्हतं.त्यावर समाजातल्या लोकांनी बहिष्कर टाकला. पण हा धंदा चालूच ठेवून प्रेमजी ठक्कर यांनी जातीत राहण्याचा प्रयत्न केला.त्यांचा मुलगा पुंजलाल ठक्कर याला आपल्या वडिलांचा आणि कुटुंबाचा अपमान आवडला नाही.त्याने आणि त्याच्या बायकोने आणि मुलांनी आपला धर्म बदलला.पण जिनाच्या भावा आणि इडिलांनी धर्म बदलला नाही. जिनाच्या वडिलांनी नंतर कठियावड सोडून कराची मध्ये गेले .तिथे त्यांचा धंदा खूप जोरात चालला.इंग्लंड मध्ये पण त्यांचे काम चालू झाले होते.त्यामुळे जिना यांचे खूप नातेवाईक हे हिंदू होते.
बॅरिस्टर जिना यांची दुसरी बायकी रतन बाई पेटिट ही तिच्या नवऱ्या पेक्षा 24 वर्षांनी लहान होती.रतन बाई चे वडील दिनशाव पेटिट हे जे आर डी टाटा यांचे मेहुणे .पण बॅरिस्टर जिना यांनी स्वतःच्या मित्राच्या मुलीशी केलेले लग्न पारशी समाजात आणि टाटा ना आवडले नव्हते.
रतन बाई जिनाह, जिनाह ची दुसरी बायको (जें आर डी टाटा यांची भाची)
बॅरिस्टर जिना यांची मुलगी दीना वाडिया .तिने लग्न नेवेली वाडिया यांशी केले.त्यांना मुलगा झाला तो म्हणजे नसली वाडिया .आणि नसली वाडिया चा मुलगा म्हणजे नेस वाडिय(प्रिती झिंटा याचा प्रियकर).दीना वाडिय यनिंकेलेलं लग्न जिनाह याना आवडले नव्हते.
संदर्भ
1]टाटायान गिरीश कुबेर
बॅरिस्टर जिनाह आणि त्यांची कन्या दीना वाडिया
No comments:
Post a Comment