Friday, August 19, 2022

भगवान श्री कृष्णाबद्दल उत्कृष्ट माहिती

भगवान श्री कृष्णाबद्दल उत्कृष्ट माहिती

१) श्रीकृष्णाचा जन्म ५२५२ वर्षांपूर्वी झाला.
२) जन्मतारीख : १८ जुलै, ३२२८ इ.स. पूर्व.
३) महिना : श्रावण
४) दिवस : अष्टमी
५) नक्षत्र : रोहिणी
६) दिवस : बुधवार
७) वेळ : 00: 00 सकाळी
८) श्री कृष्ण १२५ वर्षे, ०८ महिने आणि ०७ दिवस जगले.
९) मृत्यूची तारीख : १८ फेब्रुवारी ३१०२ इ.स. पूर्व
१०) जेव्हा कृष्ण   ८९ वर्षांचे होते, महायुद्ध (कुरुक्षेत्र युद्ध) झाले.
११) कुरुक्षेत्र युद्धानंतर ३६ वर्षांनी त्यांचा मृत्यू झाला.
१२) कुरुक्षेत्र युद्ध मृगशिरा शुक्ल एकादशी, ३१३९ रोजी सुरु झाले होते. २१ डिसेंबर ३१३९  इ.स. पूर्व रोजी "दुपारी ३ ते संध्याकाळी ५" दरम्यान सूर्यग्रहण होते, जयद्रथाच्या मृत्यूचे कारण.
१३) भीष्म २ फेब्रुवारी, (उत्तरायणाची पहिली एकादशी), ३१३८ इ.स. पूर्व मरण पावले.
१४) कृष्णाची पूजा केली जाते :
( १) कृष्ण कन्हैया : मथुरा
(२) जगन्नाथ :- ओडिशा मध्ये
(३) विठोबा :- महाराष्ट्रात
(४) श्रीनाथ : राजस्थान मध्ये
(५) द्वारकाधीश : गुजरातमध्ये
(६) रणछोड :  गुजरातमध्ये
(७) कृष्णा : कर्नाटकातील उडुपी 
(८) केरळमधे : गुरुवायुरप्पन

१५) पिता : वासुदेव.
१६) आई : देवकी
१७) दत्तक पिता :- नंदा 
१८) दत्तक आई : यशोद
१९) मोठा भाऊ : बलराम
२०) बहीण : सुभद्रा 
२१) जन्म ठिकाण : मथुरा
२२) धर्मपत्नी : रुक्मिणी, सत्यभामा, जांबवती, कालिंदी, मित्रविंदा, नागनाजिती, भद्रा, लक्ष्मण.
२३) कृष्णाने त्याच्या आयुष्यात फक्त ४ लोकांना ठार मारल्याची नोंद आहे.
(१) चानूर, पैलवान
(२) कंस, त्याचे मामा
(३, ४)  शिशुपाल आणि दंतवक्र त्याचे चुलत भाऊ.
२४) जीवन त्यांना अजिबात योग्य नव्हते. त्याची 
आई उग्रा कुळातील होती, आणि वडील यादव कुळातील,
२५) श्याम वर्णीय. संपूर्ण गोकुळ गाव त्यांना कान्हा म्हणून बोलवायचे. काळा, लहान आणि दत्तक असल्याबद्दल त्याची खिल्ली उडवली गेली आणि त्याची छेड काढण्यात आली. त्याचे बालपण जीवघेण्या परिस्थितीने घडले.
२६) 'दुष्काळ' आणि "जंगली लांडग्यांचा धोका" त्यांना वयाच्या ९ व्या वर्षी 'गोकुळ' वरून 'वृंदावन' मध्ये हलवले
२७) ते १० वर्षे ८ महिनेपर्यंत वृंदावनात राहिले. त्यांनी मथुरा येथे वयाच्या १० वर्षे आणि ८ महिन्यांच्या वयात आपल्याच काकांना ठार मारले, त्यानंतर त्याने आपल्या आई आणि वडिलांना सोडले.
२८) ते पुन्हा कधीही वृंदावनात परतले नाही.
२९) सिंधू राजाच्या धमकीमुळे त्याला मथुरेहून द्वारकाला स्थलांतर करावे लागले, कला यावना.
३०) त्याने गोमंतक टेकडीवर (आता गोवा) 'वैनाथेय' जमातींच्या मदतीने जरासंधाचा पराभव केला.
३१) त्याने द्वारकाची पुनर्बांधणी केली.
३२) त्यानंतर ते शालेय शिक्षण सुरू करण्यासाठी उज्जैन येथील सांदीपनीच्या आश्रमात गेले.
३३) त्याला आफ्रिकेतील समुद्री चाच्यांशी लढावे लागले आणि त्याच्या शिक्षकांच्या मुलाला सोडवावे लागले; पुनारदत्त, प्रभासाजवळ कोणाचे अपहरण झाले होते, गुजरातमधील समुद्री बंदर.
३४) शिक्षणानंतर त्याला वनवासच्या आत्ये भावांच्या नशिबाची माहिती मिळाली. '' वॅक्स हाऊस'' मध्ये तो त्यांच्या मदतीला आला आणि नंतर त्याच्या आत्येभावांनी द्रौपदीशी लग्न केले. या गाथेत त्यांची भूमिका प्रचंड होती.
३५) मग, त्याने आपल्या आत्येभावांना इंद्रप्रस्थ आणि त्यांचे राज्य स्थापन करण्यास मदत केली.
३६) त्याने द्रौपदीला लाजिरवाण्यापासून वाचवले.
३७) तो त्याच्या आत्येभावांना त्यांच्या वनवासात उभा राहिला.
३८) तो त्यांच्या पाठीशी उभा राहिला आणि त्यांना कुरुक्षेत्र युद्ध जिंकून दिले.
३९) त्याने आपले प्रिय शहर पाहिले, द्वारका वाहून गेला.
४०) त्याला जवळच्या जंगलात एका शिकारीने (जरा नावाने) ठार केले.
४१) त्याने कधीही चमत्कार केले नाहीत, त्याचे आयुष्य यशस्वी नव्हते. असा एकही क्षण नव्हता जेव्हा तो आयुष्यभर शांत होता. प्रत्येक वळणावर त्याला आव्हाने 
आणि त्याहूनही मोठी आव्हाने होती.
४२) त्याने प्रत्येक गोष्टीचा आणि प्रत्येकाचा जबाबदारीच्या भावनेने सामना केला आणि तरीही तो अटळ राहिला.
४३) तो एकमेव व्यक्ती आहे, ज्याला भूतकाळ आणि भविष्य माहित होते, तरीही तो नेहमी त्या वर्तमान क्षणी जगला.
४४) तो आणि त्याचे जीवन खरोखरच प्रत्येक मनूष्यासाठी एक उदाहरण आहे.

जय श्री कृष्ण...cp

Wednesday, August 17, 2022

आठवणींच्या गाठोड्यातून

स्मशानातील सोनं...

शेजारच्या गावात एक बलाढ्य सावकार मरण पावल्याची बातमी ऐकून भीमानं ताडकन उडी मारली. त्याला समाधानाचं भरत आलं. आनंद त्याच्या हृदयात मावेनासा झाला. त्यानं त्या गावाकडे पाहून भरकन आपली नजर आकाशात सूर्याकडे झुगारली.
सूर्य तेव्हा मावळत होता. आकाशात पावसाळी ढगांनी गर्दी केली होती. ते नांगरून पडलेल्या जमिनीप्रमाणे ओबड धोबड दिसत होते. त्या आक्राळ विक्राळ ढगातून मावळता प्रकाश मुंबईवर वर्षत होता.
वारा मंद वाहत होता. त्यामुळे ते घनदाट जंगल करकरत होतं आणि त्या जंगलात बसलेली ती पन्नास झोपडी भेदरलेली होती. जुने पत्रे, चटया, फळ्या, पोती यांनी तिथं घरांचा आकार घेतला नि त्या घरात मानसं राहात होती. बेकार वस्तूंनी तिथं बेकारांवर च्या धरली होती. दिवसभर पोटाच्या पाठी धावून दमलेली माणसं आता तिथं स्थिरावली होती. सर्वत्र चुली पेटल्या होत्या. हिरव्या झाडीतून शुभ्र धूर रेंगाळत होता. पोर खेळत होती. एका प्रचंड चिंचेखाली भीमा विचारमग्न बसला होता. त्याच्या हृदयात भयंकर हुरहूर उठली होती. त्याला त्या मेलेल्या सावकाराची ओढ लागली होती. त्याचा आत्मा कित्येक वेळा त्या गावच्या स्मशानात जाऊन परत त्या चिंचेखाली येत होता. भीमा पुनः पुनः सूर्याकडे पाहून त्या गावाकडे पाहत होता. त्याला आता अंधाराची गरज होती, म्हणून तो चुळबुळत होता. त्याची लाडकी लेक नाबदा जवळच खेळत होती आणि बायको घरात भाकरी थापीत होती. हा भीमा अंगापिंडान जबरा होता. तो भर पहिलवाना सारखा दिसे. त्याचं प्रचंड मस्तक, रुंद गर्दन, दाट भुवया, पल्लेदार मिशा, रुंद पण तापट चेहरा पाहताच कित्येक दादांना हूडहुडीच भरत असे.
भीमाच गाव दूर वारणेच्या काठी होत. पण रेड्याच बळ असूनही पोट भरत नाही म्हणून तो मुंबईला आला होता. मुंबईत येऊन त्यानं काम मिळावं म्हणून सगळी मुंबई पालथी घातली होती, पण त्याला काम मिळालं नव्हतं. आपणाला काम मिळावं, आपण कामगार व्हावं, पगार आणावा, बायकोला पुतळ्यांची माळ करावी, अशी कित्येक स्वप्न फाटून भीमा निराश होऊन त्या उपनगरात, जंगलात आला होता. मुंबईत सर्व आहे पण काम आणि निवारा या दोन गोष्टी नाहीत यामुळे त्याला मुंबईचा राग आला होता आणि त्या उपनगरा जवळ येताच शेजारच्या डोंगरात एका खाणीत त्याला कामही मिळालं होत.
त्या जंगलात काम आणि निवारा मिळताच भीमाला आनंद झाला होता. तो आपलं रेड्याच बळ घेऊन त्या डोंगराला जणू टक्करच देत होता. त्यानं टिकाव घेताच डोंगर मागं सरकत होता. त्यानं सुतकी उचलताच काळे पाषाण तोंड पसरत होते. त्यामुळे कंत्राटदार त्याच्यावर खुश होता आणि भीमाही संतुष्ट होता; कारण त्याला पगार मिळत होता.
परंतु सहाच महिन्यात ती खाण बंद पडली आणि भीमावर बेकारीची कु-हाड कोसळली. तो एका सकाळीच कामावर रुजू झाला आणि लगेच त्याला समजले कि आजपासून हि खाण बंद झाली. आपलं काम सुटलं हि वार्ता ऐकून भीमा भांबावला. उपासमार त्याच्यापुढे नाचू लागली. क्षणात तो विवंचनेच्या डोहात बुडाला. उद्या काय हा एकच प्रश्न तो स्वतःला विचारू लागला.
अंगातील कापडं काखेत दाबून भीमा घरी निघाला होता. तो एका ओढ्यावर थांबला. त्यानं तिथं आंघोळ केली आणि उद्विग्न मनःस्थितीत तो घराकडे फिरला, तो त्याची नजर एका राखेच्या ढिगा-यावर स्थिरावली. ती राख मढ्याची होती. जळकी हाडं सर्वत्र पसरली होती. त्या मानवी हाडांच्या जळक्या खुळप्या पाहून भीमा अधिकच गंभीर झाला. एखादं बेकार असेल बिचारं, कंटाळूनच मेलं असेल. सुटलं असेल एकदाच – असं मनाला सांगू लागला. आपणही असेच मरणार! दोनच दिवसात उपासमार सुरु; मग नाबदा रडत बसेल. बायको मलूल होईल आणि आपण काहीच करू शकणार नाही.
इतक्यात त्या राखेच्या ढिगावर काहीतरी चमकलं. तसा भीमा पुढे आला. त्याने वाकून, निरखून पाहिलं. तिथं एक तोळ्याची सोन्याची अंगठी होती. ती चटकन उचलून भिमानं करकरून मुठ दाबली. त्याला आनंद झाला. एक तोळा सोनं आणि तेही मढ्याच्या राखेत, याचा त्याला हर्ष झाला. मढ्याच्या राखेत सोनं असतं याचा त्याला नवा शोध लागला. जगण्याचा नवा मार्ग सापडला.
आणि दुस-याच दिवसापासून भीमा त्या प्रदेशात सर्वत्र हिंडु लागला. नदी नाल्यातील मसनवटे तुडवू लागला. प्रेताची राख जमवून तो चाळणीन चाळू लागला आणि रोज त्या राखेतून सोन्याचे कण काढू लागला. बाळी, मुदी, नथ, पुतळी, वाळा, असे काही न काही घेऊन रोज येऊ लागला.
भीमाचा हा नवा उद्योग जोरात सुरु होता. तो निर्भय होऊन राख चाळीत होता. अग्नीच्या दाबान प्रेताच्या अंगावरच सोनं वितळून त्याच्या हाडात जातं याचा त्यानं ठाव घेतला. जळकी हाडं वेचून तो त्यातून सोन्याचे कण काढी. कवट्या फोडी मनगट कुटी पण सोनं मिळवी.
संध्याकाळी तो कुर्ल्याला जाऊन ते सोनं विकून रोख रक्कम मोजून घेई आणि घरी येते वेळी नाबदा साठी खजूर घेई. त्याचा तो धंदा अखंड चालला होता.
भीमा प्रेताची राख चाळून जगत होता. त्यामुळे जगणे नि मरणे यातील अंतरच त्याला कळेनासे झाले होते. ज्याच्या राखेत सोनं असेल ती राख श्रीमंताची आणि सोनं नसेल ती राख गरीबाची अशी त्याची ठाम समजूत झाली होती. मरावं तर श्रीमंतानं आणि जगावं तर श्रीमंतानं, गरिबांन मरू नये असा त्याचा दावा होता. अवमानित पामराला जगण्याचा नि मरण्याचा मुळीच अधिकार नाही असं तो शेजा-यांना दरडावून सांगत होता. जो मरतेसमयी तोळाभर सोनं दाढेत घेऊन मरतो तो भाग्यवान असतो असं त्याच मत होतं.
बेकारीच्या उग्रतेनं त्याला उग्र केलं होतं. तो रात्रंदिवस मसणवटी धुंडाळीत होता. मढं हे त्याच्या जीवनाचं साधन झालं होतं. त्याचं जीवन मढ्याशी एकरूप झालं होतं.
त्याचं दरम्यान त्या भागात अनेक चमत्कार घडत होते. पुरलेली मढी बाहेर पडत होती. एका सावकाराच्या तरुण सुनेचं प्रेत स्मशानातून नदीवर येऊन पडलं होतं आणि त्या प्रकारामुळे कित्येक लोक भयभीत झाले होते. अलीकडे मढी नदीपर्यंत कशी जातात त्याचं यांना नवल वाटत होतं. कुणीतरी प्रेत उकरून काढीत असावा असा संशय येऊन पोलीस खातं पाळतीवर होतं. पण मढ्यावर पाळत करणं तितकं सोपं नसतं.
सूर्य मावळला. सर्वत्र अंधार पसरला. भीमाच्या बायकोनं भीमाला जेवण वाढलं. तेव्हा तो गंभीर होऊन जेऊ लागला. आज हा कुठंतरी जाणार हे लक्षात येऊन ती हळूच म्हणाली ,”आज कुठं जाणार वाटतं ? मला वाटतं हे काम नको आम्हाला. कुठंतरी दुसरं काम करा. मढं, मढ्याची राख , सोनं, संसार हे सारंच विपरीत आहे. लोक नावं ठेवतात.”
“तू बोलू नको.” तिचं बोलणं एकूण भिमाचं मन दुखावलं. तो चिडक्या स्वरात म्हणाला, “मी काहीही करीन. त्याचं काय जातं? माझी चूल बंद झाल्यावर कोण पेटवणार आहे का?”
“तसं नव्हे -” नव-याचा तो उग्र चेहरा पाहून ती हळूच म्हणाली,
“भुतासारखं हे हिंडणं चांगलं नाही. मला भीती वाटते म्हणून म्हणते.”
“मसणवट्यात भुतं असतात असं तुला कोणी सांगितलं? अगं, हि मुंबई एक भूतांचा बाजार आहे. खरी भुतं घरात राहतात आणि मेलेली त्या मसणवट्यात कुजतात. भूतांची पैदास गावात होते – रानात नाही.” भीमा म्हणाला.
त्याचं हे बोलणं ऐकूण ती गप्प झाली आणि भीमान निघण्याची तयारी केली. तो गुरकून म्हणाला, “मुंबई चाळून मला काम मिळालं नाही. पण मढ्याची राख चाळून सोनं मिळालं. डोंगर फोडला तेव्हा दोन रुपये दिले मला. पण आता सहज ती राख मला दहा रुपयेही देते -” असं म्हणून तो घराबाहेर पडला. तेव्हा बरीच रात्र झाली होती. सर्वत्र निःशब्द शांतता नांदत होती नि भीमा निघाला होता.
भीमा अंधारातून निघाला होता. त्यानं डोकीला टापर बांधली होती. वर पोत्याची खोळ घेतली होती आणि कंबर बांधलेली होती. काखेत एक अणीदार पहार घेऊन तो ढेंगा टाकीत होता. त्याच्या सभोवती घोर अंधार थैमान घालीत होता. त्याला कसलीही भीती वाटत नव्हती. सकाळी लुगडं, एक परकर पोलका, खजूर एवढाच विचार करीत होता. आज तो बिथरला होता.
वातावरण घुमत होतं. क्षणोक्षणी गंभीर होत होतं, मध्येच एखादं कोल्ह्याचं टोळकं हुकी देऊन पळत होतं. एखादा साप सळसळत वाट सोडून जात होता. दूर कुठंतरी घुबड घुत्कार करून भेसूरतेत भर घालीत होतं. त्या निर्जन जंगलात सर्वत्र ओसाड दिसत होतं
कानोसा घेत भीमा गावाच्या जवळ आला. त्यानं खाली बसून दूर पाहिलं. गावात सामसूम झाली होती. अधून मधून कोणीतरी खाकरत होतं, एखादा दिवा डोळे मिचकावीत होता. परिस्थिती अनुकूल आहे असं पाहून भीमाला आनंद झाला आणि तो चटकन स्मशानात शिरून त्या आजच्या सावकाराची नवी गोर शोधू लागला. फुटकी गाडगी, मोडक्या किरड्या बाजूला सारीत या गोरीवरून त्या गोरीवर उड्या मारीत निघाला. प्रत्येक ढेपनिपाशी जाऊन कडी ओढून पाहू लागला. एका रांगेने तो नीर काढीत निघाला होता.
आकाशात ढगांनी गर्दी केली होती, त्यामुळे अंधार अधिकच काळा झाला होता; पण एकाएकी वीज उठली होती. ती ढगाच्या कप्प्यात नाचत होती. पाऊस पडण्याचा संभव वाढला होता. त्यामुळे भीमा घाबरला होता. पाऊस पडला कि नवी गोर सापडणार नाही, याची त्याला चिंता पडली होती, म्हणून तो चपळाई करीत होता. त्याला घाम फुटला होता नि तो भान हरपला होता.
मध्यानरात्री पर्यंत त्यानं सारं स्मशान चाळलं. या टोकापासून त्या टोकाला तो जाऊन पोहचला आणि भयचकित होऊन मटकन बसला. वर भरभरत होतं. मोडक्या किरडीच्या जुन्या झावळ्या फडफडत होत्या. जणू कोणीतरी दातचं खात असावं, तसं ऐकू येत होतं आणि त्यातून भयंकर गरगुर उठत होती. कोणीतरी गुरगुरत होतं, मुसमुसत होतं आणि माती उकरीत होतं. त्याला नवल वाटलं. तो पुढे सरकला तोच सर्व काही शांत झालं. आवाज येईनासा झाला; परंतु तोच कुणीतरी हात पाय झाडीत असल्याचा भास होऊन तो चमकला. खटकन जागीच थांबला. विद्युतगतीनं भीती त्याच्या देहातून सरकून मस्तकाकडे धावली. आयुष्यात आजच तो प्रथम भयभीत झाला.
परंतु दुस-याच क्षणी त्यानं स्वतः ला सावरलं. खरा प्रकार त्याच्या लक्षात आला आणि तो स्वतःचं खजील झाला. कारण जवळचं ती नवी गोर होती आणि दहा पंधरा कोळी जमून तिला चौफेर उकरीत होती. त्यांना मेलेल्या माणसाचा वास लागला होता. गोरीवरचे दगड तसेच ठेऊन दुरूनच त्यांनी घळी पडायला आरंभ केला होता. आजुबाजूनं गोर उध्वस्त करण्याचं काम ती करीत होती; परंतु पुनः त्यांच्यातही भयंकर स्पर्धा निर्माण झाली होती. प्रथम मढ्या जवळ कोण जाणार या इर्षेनं ती एकमेकांवर गुरगुरत होती. पुनः नाकानं वास घेत होती आणि प्रेताचा वास येताच ती सर्वशक्ती एकवटून माती ओढीत होती.
हा प्रकार लक्षात येताच भीमा चिडला. त्यानं प्रचंड झेप घेतली आणि तो झपकन त्या गोरीवरच जाऊन बसला. लगेच गोरीवरचे दगड उचलून त्याने त्या कोल्ह्यांच्या टोळीवर हल्ला चढवला.
अचानक झालेल्या त्या भडीमारानं कोल्ही चमकली, चमकली नि मुरून बसली. तसा भीमाला चेव आला. कोल्ह्याआधी आपणच गोर उकरायची असं ठरवून तो गोरीवरची माती काढू लागला.
आणि त्याच वेळी कोल्ह्यांनी भीमाला पाहिला. एक कोल्हा पिसाट होऊन भिमावर धावला. क्षणात भीमाचा लचका तोडून तो पुढे पळाला. अंगावरच पोतं झटकून त्यानं हातातील पहार सरळ सरळ धरली. तो कोल्हा पुनः भीमावर धावला नि त्याच्याशी झुंज घ्यायला तयार झाला. कोल्हा पुढे येताच त्यानं दणका दिला. झपाट्यानं कोल्हा गारद झाला. बाजूला पडून त्यानं पाय खोडून प्राण सोडला नि रणधुमाळी सुरु झाली. पुनः भीमा गोर उकरू लागला आणि मग सर्व कोल्ही त्याच्यावर तुटून पडली. भयंकर युद्धाला आरंभ झाला.
भीमानं निम्मी गोर उकरून मढे अर्धे उघडे केले होते; पण कोल्ह्यांच्या हल्ल्यापुढे तो भांबावून गेला आणि हातात पहार घेऊन त्यानेही प्रतिकाराला सुरवात केली होती.
चारी बाजूने कोल्ही त्याच्यावर धावत होती आणि जिकडून कोल्हे येईल तिकडे तो दणका मारीत होता. कोल्हे तीरपडून पडत होते आणि अचानक लचका तोडून पळत होते.
गावाच्या शेजारी ते अभूतपूर्व युद्ध पेटलं होतं. कुंतीपुत्र भीमाच नाव धारण करणारा तो आधुनिक भीम कोल्हयांशी लढत होता. उद्याच्या अन्नासाठी, मढ्यासाठी, आपली सर्वशक्ती पणाला लावून लढत होता. पशु आणि मानव याचं मृतदेहासाठी दारूण रण पेटलं होतं.
सुर्ष्टी निद्रा घेत होती. मुंबई विश्रांती घेत होती. तो गाव निपचित पडला होता आणि त्या स्मशानात सोन्यासाठी नि मढ्यासाठी झटापटिला जोर चढला होता. भीमा प्रहार करून कोल्ह्यांना पाडीत होता. कोळी त्याचा मार चुकवून त्याचा लचका तोडीत होती, किंवा त्याच्या मारानं घायाळ होऊन किंचाळत होती. भीमा लचका तुटताच विव्हळत होता. शिव्या देत होता. शिव्या, मार, गुरगुरणे, किंचाळणे यामुळे ते स्मशान थरारले होते.
कितीतरी उशीराने कोल्ह्यांचा हल्ला थांबला. अंधारात दबा धरून ती सर्व कोल्ही विश्रांती घेऊ लागली आणि तो अवसर मिळताच भीमानं त्या गोरीतील ते प्रेत काढून मोकळं केलं. तोंडावरचा घाम पुसून टाकला आणि तो त्या गोरीत उतरला. तोच पुनः कोळी तुटून पडली नि पुनः हाणामारीला सुरवात झाली; परंतु भीमाच्या प्रचंड शक्तीपुढे अखेर कोल्ही पराभूत झाली, त्यांनी आपला पराजय काबुल केला.
आणि लगेच भीमानं त्या प्रेताच्या काखेत हात घालून जोरानं ते प्रेत उपसून वर काढलं. मग काडी ओढून प्रेताची पाहणी केली. दडदडीत ताठलेलं मढ त्याच्या पुढं त्या गोरीत उभं होतं. त्यानं चपळाई करून त्या प्रेताचा हात चाचपून पहिला. एक अंगठी सापडली. कानात मुदी होती. ती भीमानं ओरबाडून काढली. नंतर त्याला आठवण झाली कि प्रेताच्या तोंडात नक्की सोनं असणार. त्यानं त्याच्या तोंडात बोटं घातली; पण प्रेताची दातखिळी घट्ट बसली होती. क्षणात त्याने आपली प्रहार प्रेताच्या जबड्यात घालून त्याची बचाळी उचकटली. एका बाजून ती पहार जबड्यात घालून दुसर्या बाजून त्यानं आपली बोटं त्या प्रेताच्या तोंडात घातली आणि त्याचवेळी दबा धरून बसलेल्या कोल्ह्यांनी कोल्हेकुई केली. सर्वांनी हुकी देऊन पळ काढला. पण त्यांच्या ओरडीनं गावातली कुत्री जागी झाली आणि कुत्र्यांनी गाव जागा केला. ” आरं कोळ्यांनी प्रेत खाल्लं, चला ” असं कुणीतरी ओरडलं नि ते ऐकून भीमा घाबरला. त्यानं प्रेताच्या तोंडातून एक अंगठी काढून खिशात टाकली आणि घाईघाईनं पुनः डाव्या हाताची बोटं प्रेताच्या दाढेत घालून सर्व कोपरे चाचपून पहिले आणि – बोटं काढून नंतर पहार काढण्या ऐवजी प्रथम त्यानं पहारच काढली. घटकन त्याची दोन बोटं प्रेताच्या दातात अडकली. आडकित्यात सुपारी सापडावी तशी सापडली. भयंकर कळ त्याच्या अंगात वळवळली.
आणि त्याचवेळी गावाकडून कंदील घेऊन मानसं येत असलेली दिसली. तसा भीमा भयभीत झाला. त्यानं बोटं काढण्याची शिकस्त केली. त्याला प्रेताच राग आला. त्याच्याकडे येणारी मानसं पाहून तो अधिकच चिडला. त्याने हातातील लोखंड प्रेताच्या टाळूवर जोराने मारले. आणि त्या दणक्याने त्याची बोटं अधिकच अडकली. प्रेताचे दात बोटात रुतले. त्याच्या अंगात मुंग्या उठल्या. हेच खरं भुत हे आपणाला पकडून देणार. लोक येऊन प्रेतासाठी मला ठार करतील, नाही तर मारमारून पोलिसांच्या हवाली करतील असं वाटून भीमा आगतिक झाला, वैतागला, निर्भान झाला. सर्व शक्ती एकवटून तो प्रेतावर प्रहार करू लागला. ‘ भडव्या, सोड मला.’ तो जोरानं ओरडला.
गावकरी जवळ होते. भीमा अडकला होता. मग त्यानं विचार केला आणि नंतर पहार त्या प्रेताच्या जबड्यात घातली आणि मग हळूच बोटं ओढून काढली तेव्हा ती कातरली गेली होती, फक्त चामाडीला चिकटून लोंबत होती. ती तशीच मुठीत घेऊन त्यानं पळ काढला. भयंकर कळ अंगात घेऊन तो पळत होता.
तो घरी आला तेव्हा त्याला भयंकर ताप भरला होता. त्याची ती स्थिती पाहून घरात रडारड सुरु झाली.
त्याच दिवशी डॉक्टरनं भीमाची दोन बोटं कापून काढली.
आणि त्याच दिवशी खाणीचं काम पुनः सुरु झाल्याची बातमी आली. ती ऐकून हत्तीसारखा भीमा लहान मुलाप्रमाणे रडू लागला. कारण डोंगर फोडणारी ती दोन बोटं तो स्मशानातील सोन्यासाठी गमावून बसला होता.

-लोकशाहीर अण्णाभाऊ साठे

Friday, August 12, 2022

हनुमान चालीसा

माना जाता है कि श्रीराम अवतार के समय 
हनुमान जी को स्वयं भगवान श्रीराम ने 
अमर होने का आशीर्वाद दिया था। 
इसी कारण हनुमानजी का प्रताप चारों युगों में रहा है 
और आगे भी रहेगा, क्योंकि वे अजर-अमर हैं। 
अंजनी सुत जब तक चाहें शरीर में रहकर 
इस धरती पर मौजूद रह सकते हैं।

माना जाता है  कि पूरे ब्रह्मांड में हनुमानजी ही एकमात्र ऐसे देवता हैं जिनकी भक्ति से हर तरह के संकट तुरंत ही हल हो जाते हैं और यह एक चमत्कारिक सत्य है।@सुविचार गुप्र 

हनुमान जी की स्तुति के लिए आज के समय में सबसे सरल व सहज वंदना हनुमान चालीसा को माना गया है। हनुमान चालीसा का आधुनिक दुनिया में महत्व बहुत अधिक माना जाता है।
 
हनुमान चालीसा को महान कवि गोस्वामी तुलसीदास जी ने लिखा था । हनुमान चालीसा से पहले भी हनुमानजी पर कई चालीसा लिखी गई और कई स्तुतियां भी लिखी गई थीं लेकिन हनुमान चालीसा का महत्व इसीलिए आधुनिक युग में है क्योंकि यह पढ़ने और समझने बहुत ही सरल है और यह भी कि इस चालीसा में हनुमानजी के संपूर्ण चरित्र का वर्णन हो जाता है जिससे उनकी भक्ति करने में आसानी होती है।
 
हनुमानजी की भक्ति के लिए आप को ई भी स्तुति या वंदना पढ़ें लेकिन हनुमान चालीसा सच में ही अपने आप में एक संपूर्ण रामचरि‍त मानस की तरह है। 

हनुमान चालीसा लिखने वाले तुलसीदासजी राम के बहुत बड़े भक्त थे। उनके इसी विश्वास के कारण औरेंगजेब ने उन्हे बंदी बना लिया था। माना जाता है  कि वहीं बैठकर उन्होंने हनुमान चालीसा लिखा था। अंत में ऐसे कुछ हुआ कि औरंगजेब को उन्हें छोड़ना पड़ा था। 
 
हनुमान चालीसा में 40 छंद होते हैं जिसके कारण इसको चालीसा कहा जाता है। यदि कोई भी इसका पाठ करता है तो उसे चालीसा पाठ बोला जाता है। आधुनिक युग की भागम-भाग में हनुमान चालीसा ही एक ऐसा पाठ है जिसे तुरंत ही आसानी से पढ़ा जा सकता है, लेकिन उसके लिए हनुमानजी की श्रद्धा भक्ति होना जरूरी है।@सुषमा गौड

आज के युग में सनातन धर्म में हनुमान चालीसा का बड़ा ही महत्व है।हनुमान चालीसा के प्रभाव को तो धीरे धीरे पश्चिम की जनता ने भी स्वीकार करना शुरू कर दिया है। 

कहा जाता है कि आज के युग में विश्व शक्ति माने जाने वाले राष्ट्र अमेरिका के पूर्व राष्ट्रपति बराक ओबामा के सिर पर भगवान हनुमान जी का हाथ है। जी हां, बराक ओबामा हनुमानजी के बहुत बड़ भक्त हैं। इतने बड़े भक्त कि वो उनकी एक छोटी सी मूर्ति हमेशा अपनी जेब में रखते हैं।

एक इंटरव्यू के दौरान बराक ओबामा ने बताया कि जब भी वो परेशान या थका हुआ महसूस करते हैं तो हनुमान जी से मदद मांगते हैं। उनका मानना है कि इससे उन्हें पॉजीटिव एनर्जी प्राप्त होती है। 

हनुमान  चालीसा को पढ़ते रहने से व्यक्ति के मन में साहस, आत्मविश्वास और पराक्रम का संचार होता है। इसके कारण ही वह संसार पर विजय प्राप्त कर लेता है। 
 
इसके एक एक छंद का बहुत महत्व है जैसे-
 
1.बच्चे का पढ़ाई में मन ना लगे तो उसको इस छंद का पाठ करना चाहिए- बल बुधि बिद्या देहु मोहिं, हरहु कलेस बिकार।
 
2.मन में अकारण भय हो तो निम्न पंक्ति पढ़ना चाहिए- भूत पिशाच निकट नहीं आवे महावीर जब नाम सुनावे।
 
3.किसी भी कार्य को सिद्ध करना हो तो यह पंक्ति पढ़ें- भीम रूप धरि असुर सँहारे, रामचन्द्र के काज सँवारे।

4.बहुत समय से यदि बीमार हैं तो यह पंक्ति पढ़ें- नासै रोग हरे सब पीरा, जपत निरन्तर हनुमत बीरा।
 
5.प्राणों पर यदि संकट आ गया हो तो यह पंक्ति पढ़ें- संकट कटै मिटै सब पीरा, जो सुमिरै हनुमत बलबीरा।
या संकट तें हनुमान छुड़ावै, मन क्रम बचन ध्यान जो लावै
 
6.यदि आप बुरी संगत में पड़े हैं और यह संत छुट नहीं रही है तो यह पढ़ें- महाबीर बिक्रम बजरंगी, कुमति निवार सुमति के संगी
 
7.यदि आप किसी भी प्रकार के बंधन में हैं तो- जो सत बार पाठ कर कोई, छूटहि बन्दि महा सुख होई।
 
8.किसी भी प्रकार का डर है तो यह पढ़ें- सब सुख लहै तुम्हारी सरना, तुम रक्षक काहू को डरना।
 
9.आपके मन में किसी भी प्रकार की मनोकामना है तो पढ़ें- और मनोरथ जो कोई लावै, सोई अमित जीवन फल पावै।

जय श्री राम🙏

Wednesday, August 3, 2022

*ग्रेट डॉ. अब्दुल कलाम सर*

*ग्रेट डॉ.अब्दुल👍कलाम सर*

आपल्यापैकी बर्‍याच जणांना विश्वास ठेवणे कठीण होईल.  परंतु हे *कलाम सरांचे सचिव श्री नायर यांनी लिहिले आहे.*

 *अविश्वसनीय आणि धक्कादायक माहिती वाचा.*

 डी. पोधीगाई यांनी श्री पी. एम. नायर यांची मुलाखत प्रसारित केली. (निवृत्त आयएएस अधिकारी जे  डॉ. अब्दुल कलाम सरांचे सचिव होते सर देशाचे राष्ट्रपती असताना.)

 भावनांनी ओथंबलेल्या आवाजामध्ये त्यांनी बोललेले मुद्दे मी थोडक्यात सांगतो.

  श्री नायर यांनी *"कलाम इफेक्ट"* नावाच्या पुस्तकाचे लेखन केले.

 १. अनेक राष्ट्रांना भेट देणाऱ्या राज्य प्रमुखांना भेटवस्तू देण्याची प्रथा असल्याने डॉ कलाम जेव्हा परदेशात गेले तेव्हा त्यांना महागड्या भेटवस्तू मिळत असत.

 ही भेट नाकारणे हा देशाचा अपमान आणि भारतासाठी पेच ठरेल.

 म्हणून, परदेशातुन परत आल्यावर डॉ. कलाम यांनी भेटवस्तूंचे छायाचित्र काढायला सांगितले आणि नंतर कॅटलॉज केले आणि ते संग्रहात सुपूर्द केले.

 त्यानंतर,त्यांनी त्यांच्याकडे पाहिलेच नाही.  राष्ट्रपती भवन सोडताना मिळालेल्या भेटवस्तूंमधुन त्यांनी पेन्सिलही घेतली नाही.

 २. २००२ मध्ये, डॉ. कलाम यांनी पदभार स्वीकारला त्या वर्षी, *रमजान महिना जुलै-ऑगस्टमध्ये आला.*

 राष्ट्रपतींनी इफ्तार पार्टीचे आयोजन करणे ही नेहमीची प्रथा होती.

 *डॉ. कलाम यांनी श्री नायर यांना विचारले की त्यांनी आधीच चांगले आहार घेतलेल्या लोकांना पार्टी का आयोजित केली पाहिजे ?* आणि त्यासाठी किती खर्च येईल हे शोधण्यास सांगितले.
श्री. नायर यांनी सांगितले की यासाठी सुमारे रुपये बावीस लाख रू.खर्च येईल.  

 डॉ. कलाम यांनी त्याला काही निवडक अनाथाश्रमांना अन्न, कपडे आणि ब्लँकेटच्या रूपात दान करण्यास सांगितले.अनाथ आश्रमांची निवड राष्ट्रपती भवनमधील एका टिमवर सोडली गेली होती आणि त्यात डॉ.कलाम यांची कोणतीही भूमिका नव्हती.निवड झाल्यानंतर डॉ. कलाम यांनी श्री नायर यांना त्यांच्या खोलीत येण्यास सांगितले आणि त्यांना एक लाख रुपयांचा धनादेश दिला. ते म्हणाले की आपण त्याच्या वैयक्तिक बचतीतून काही रक्कम देत आहोत आणि ही माहिती कोणालाही दिली जाऊ नये.
श्री नायर यांना इतका धक्का बसला की तो म्हणाला, "सर, मी बाहेर जाऊन सर्वांना सांगेन. लोकांना माहित असावे की येथे असा मनुष्य आहे ज्याने फक्त सरकारचे पैसेच दान केले नाहीत तर तो स्वत: चे पैसेही देत ​​आहे."

 *डॉ. कलाम हे मुस्लिम असूनही त्यांनी राष्ट्रपती असताना इफ्तार पार्टी केली नव्हती.*
*Dr. डॉ. कलाम यांना "येस सर" प्रकारचे लोक आवडत नाहीत*.एकदा जेव्हा मुख्य न्यायाधीश आले आणि काही काळ डॉ. कलाम यांनी आपले मत व्यक्त केले आणि श्री. नायर यांना विचारले,"आपण सहमत आहात?"  श्री नायर म्हणाले "नाही सर, मी तुमच्याशी सहमत नाही ".
 सरन्यायाधीश आश्चर्यचकित झाले आणि त्यांच्या कानावर विश्वास बसला नाही. एखाद्या नागरी सेवकास राष्ट्रपतींशी सहमत नसणे अशक्य होते आणि तेही इतके उघडपणे.
श्री. नायर यांनी त्यांना सांगितले की राष्ट्रपती नंतर त्यांच्याशी का सहमत नाहीत असा प्रश्न विचारतील? आणि जर दिलेले कारण तर्कसंगत असेल तर ते 99% मत बदलतील.

 Dr. डॉ. कलाम यांनी आपल्या नातेवाईकांना दिल्ली येथे येण्याचे आमंत्रण दिले आणि ते सर्व राष्ट्रपती भवनात राहिले. त्यांनी त्यांच्यासाठी जे पैसे भरले होते त्या शहराकडे जाण्यासाठी त्यांच्यासाठी एक बस आयोजित केली.कोणतीही अधिकृत कार वापरली गेली नव्हती.  डॉ. कलाम यांच्या सूचनेनुसार त्यांचा सर्व मुक्काम आणि जेवणाची गणना केली गेली आणि त्यांनी भरलेले बिल 2 लाखांवर आले.
या देशाच्या इतिहासात कोणीही केले नाही.

 आता, *क्लायमॅक्सची वाट पाहा*, डॉ. कलाम यांचा मोठा भाऊ त्याच्याबरोबर संपूर्ण आठवडाभर खोलीत राहिला कारण डॉ. कलाम यांनी आपला भाऊ त्याच्याबरोबर राहावा अशी इच्छा व्यक्त केली.ते गेल्यावर डॉ. कलाम यांना त्या खोलीचे भाडेदेखील द्यायचे होते.

 *कल्पना करा की एखाद्या देशाच्या राष्ट्राध्यक्ष ज्या खोलीत तो राहतो त्या घरासाठी भाडे देत आहे.*

  प्रामाणिकपणा हाताळण्यासाठी खूप जास्त मिळत आहे असा विचार करणार्‍या कर्मचार्‍यांनी हे कोणत्याही प्रकारे मान्य केले नाही !!!.

 कलाम सर जेव्हा कार्यकाळ संपल्यावर राष्ट्रपती भवन सोडणार होते, तेव्हा प्रत्येक स्टाफ सदस्याने जाऊन त्यांना भेट दिली.

 श्री. नायर त्यांच्या जवळ गेले. ते पलंगावर बसले होते. आणि डॉ कलाम यांनी त्यांची पत्नी का आली नाही असे विचारले.  एका अपघातामुळे ती पलंगावर असल्याचे नायर यांनी उत्तर दिले.

 दुसर्‍या दिवशी, श्री नायर यांनी आपल्या घराभोवती बरेच पोलिस पाहिले आणि काय झाले ते विचारले. ते म्हणाले की, भारताचे राष्ट्रपती त्यांच्या घरी त्यांच्या भेटीला येत होते.  ते येऊन आपल्या बायकोला भेटले आणि काही वेळ गप्पा मारल्या.

 श्री नायर म्हणतात की, *कोणत्याही देशाचे कोणतेही अध्यक्ष सरकारी सेवकाच्या घरी भेट देणार नाहीत आणि तेही अशा साध्या बहाण्याने*.

 मला वाटलं मी तुम्हाला माहितीचा तपशील द्यावा कारण तुमच्यातील बर्‍याच जणांनी टेलिकास्ट पाहिली नसेल आणि त्यामुळे ते उपयोगी पडेल.

 *एपीजे अब्दुल कलाम यांचा धाकटा भाऊ छत्री दुरुस्तीचे दुकान चालवतो*

 कलाम यांच्या अंत्यसंस्कारावेळी श्री. नायर जेव्हा त्यांची भेट घेतली तेव्हा श्री. नायर व भाऊ यांच्याबद्दल आदर दर्शवताना त्याने त्यांच्या पायाला स्पर्श केला.

 अशी माहिती सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सामायिक केली जावी कारण मुख्य प्रवाहातील मीडिया हे दर्शविणार नाही.

 *डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांनी मागे ठेवलेली मालमत्ता खालील प्रमाणे होती.*
 _
 6 अर्धी चड्डी (2 डीआरडीओ गणवेश)
 4 शर्ट (2 डीआरडीओ गणवेश)
 2500 पुस्तके
 1 फ्लॅट (त्याने दान केलेला आहे)
 1 पद्मश्री
 1 पद्मभूषण
 1 भारतरत्न
 16 डॉक्टरेट
 1 वेबसाइट
 1 ट्विटर खाते
 1 ईमेल आयडी

 त्यांच्याकडे कोणताही टीव्ही, एसी, कार, दागिने, शेअर्स, जमीन किंवा बँक बॅलन्स नव्हते.

*त्यांनी आपल्या गावाच्या विकासासाठी मागील 8 वर्षांची पेन्शन देखील दान केली होती.*

 🌱ते खरे देशभक्त आणि खरे भारतीय होते🌱

 *भारतरत्न डॉ. कलाम सर,हा देश कायम तुमचा आभारी राहील.*
🙏🏻🌱🙏🏻

कृपया🙏वरील👆माहिती👆 आपल्या परिचयातील सर्वां पर्यंत पोहोचवावी ही विनंती.
🌹🌹🌹🙏🌹🌹🌹