Thursday, August 31, 2017

*पोराला थोडं रडू द्या*

*पोराला थोडं रडू द्या*

काल पेपर वाचताना खूप छोट्याशा अश्या एका बातमीने माझं लक्ष वेधलं...बातमी होती हिंगोली मधून...वडीलांनी १० वीचे पुस्तके आणण्यास उशीर केला म्हणून एका १० वी च्या मुलाने रागाच्या भरात गळफास घेऊन आत्महत्या केली...छोटीच बातमी पण मनाला चटका लावणारी...
आपल्या वाचनात रोज अश्या बातम्या येत असतात, त्या आपण वाचतो व सोडून देतो...पण आपण कोणीही खोलात जाऊन विचार करत नाहीत की असे का? आपण थोडस मागे म्हणजे १९८० च्या आसपास किंवा त्या दरम्यान...म्हणजे आता जे लोक वय वर्ष ४५ च्या आसपास आहेत ते, शाळे मध्ये जाताना खाकी चड्डी व पांढरा शर्ट शाळेचा गणवेश असायचा तो आपल्याला मिळायचा नाही,आपल्या मोठ्या भावाचा आणि मुलींना मोठ्या बहिणीचा वापरावा लागत होता, आणि त्यालाच नीटनिटके करून आपल्याला ते वापरावे लागत होते, तशीच अवस्था आपल्या पुस्तकांची होती, पुढच्या वर्गातील मुलांची जुनी पुस्तके अर्ध्या किमतीत घ्याची आणि ती परत कव्हर लावू फाटलेली पुस्तके वर्षभर काळजीपूर्वक वापरायची आणि परत विकायची.
आताच्या मुलांना ठिगळ हा शब्दच आठवत नाही...आणि त्यांना ते काय असते ते हि माहित नाही...ते सरळ आपल्यालाच विचारतील ते काय असत! आपल्या वेळेस घरची परिस्थिती खूपच हलाखीची असल्याने वर्गातील अनेकांच्या चड्डीवर ठिगळं दिसायची...साधारण १९९५ नंतर जसे आर्थिक स्वायतेचे वारे आले आणि अनेकांच्या हातात थोडा फार पैसे येयाला लागला तसे अनेक प्रश्न निर्माण होत गेले...
आई सुद्धा जन्मलेल्या मुलाला रडल्याशिवाय दूध पाजत नाही...पण आज आपण समाजमध्ये पाहतोय कि बऱ्याच गरज नसलेल्या गोष्टी मुलांच्या हातात येत आहेत, लहान पणा पासूनच आपण पालक म्हणून मुलांना गरज नसताना सुद्धा उलट्या होई पर्यंत देतो...आज लहान मुलांच्या हातात अनेक गॅजेट्स आले आहेत, व्हाट्सअप्प, फेसबुक, इंटरनेट, केबल टीव्ही आणि इतर अनेक त्यामुळे त्यावरील बऱ्याच गोष्टी मुळे मुले जास्त आभासी दुनियेत वावरतात... पालक म्हणून आपण त्याला कशालाच नाही म्हणत नाहीत...
आज आपल्या देशात लेकरू पहिलीला आल्या पासून त्याला आपण अपंग करतोय असे माझे वैयक्तिक मत आहे,त्याला पुस्तके फुकट, वह्या फुकट, पाटी फुकट, दुपारी मस्तपैकी पोषण आहार, दप्तर फुकट आणि शिवाय त्याला नापास करायचे नाही...कशाला अभ्यास करतंय ते मग...त्याला जर सगळंच विना कष्टाचे मिळत असेल तर पुढे काय होईल...एक ऐत खाऊ पिढी तयार होईल...आज आपण विध्यार्थ्यांना उलट्या होई पर्यंत देत आहोत, त्याला त्याची काहीच गरज नाही, शाळेत मिळणार्या फुकट पुस्तकाची किमत सुद्धा आज पालकांना माहित नाही हे खूप मोठे दुर्दैव म्हणावे लागेल...
आज बऱ्याच शाळां मधून प्राथमिक स्तरावरील विध्यार्थ्यांना इंटरनेट चे शिक्षण दिले जाते...वास्तविक पाहता एकदम चुकीची पद्धत आहे ती...आणि काय शिकवावं आणि कुठे शिकवावं हे पैसा जास्त झाल्यामुळे पालकांना कळत नाही...
आज मुलांना मैदानी खेळ नको वाटतात, त्यामुळे त्याचा आपल्या वयोगटातील मुलामध्ये मिसळण्याची सवयच नाही राहिली, घरी कोणी वडीलधारी मंडळी आली तर कसे वागावे याचे सामाजिक भान पण आज लोप पावत चालले आहे...
सगळंच आयत आणि विना कष्ट मिळत असल्याने आजच्या पिढीला नाही ऐकायची सवयच नाही राहिली, ना परिस्थितीची जाण ना कशाची भीती...मुलांच्या तोडातून एकदा शब्द बाहेर पडे पर्यंत ती वस्तू त्या समोर हजर... आणि ज्या वेळेस हि मूल वयात येतात...त्या वेळी आपल्या हातातून सर्व परिस्थिती बाहेर गेलेली असते, एकादी गोष्ट नाही मिळाली तर ही मुलं त्यामुळे खूप टोकाची पावलं उचलतात, नाही ऐकण्याची सवय नसल्यामुळे ती खूप आक्रमक झालेली असतात...
लाड करावेत पण ते हि नियंत्रणात...आज मुलाच्या बाबतीत प्रत्येक पालक नको तितका जागरूक झाला आहे,पालकांच्या भल्या मोठ्या अपेक्षा वाढलेल्या आहेत, काय करावे आणि काय नाही तेही आज समजण्याच्या पलीकडे गेलं आहे...
कष्टाला दुसरा कोणताही शॉर्टकट नाही हे त्या मुलांना बालपणी पासूनच मनावर बिबविण्याची गरज आहे...
तरच हे बालकं टिकतील...म्हणून म्हणतो की मुलांना थोडं रडू द्या...थोडं रडू द्या...!!

No comments:

Post a Comment