Monday, January 16, 2017

ЁЯНЛ *!! рдордз-рд▓िंрдмुрдкाрдг्рдпाрдЪे рдЬाрджुрдИ рдЧुрдгрдзрд░्рдо !!*

🍋 *!! मध-लिंबुपाण्याचे जादुई गुणधर्म !!*

रिकाम्या पोटी मध-लिंबूपाणी घेण्याचे हे 8 फायदे तुम्हाला माहित आहे का ?

सकाळी रिकाम्या पोटी गरम पाण्यासोबत मध आणि लिंबाचा रस घेतल्यास तुमचं  वजन नक्कीच घटू  शकतं मात्र  वजन कमी करण्यासोबतच अनेक जादुई गुणधर्म दडले आहेत या  'मध - लिंबू' मिश्रित पाण्यात तर मग पहा काय काय  करू शकते मध – लिंबुपाणी.....

*कसे बनवाल हे मिश्रण ?*

एक मोठा ग्लास कोमट पाण्यात अर्ध्या लिंबाचा रस  आणि एक टीस्पून मध घेऊन मिश्रण एकत्र करा. मधुमेही देखील हे मिश्रण घेऊ शकतात. हे मिश्रण घेतल्या नंतर अर्धा  तास चहा , कॉफी  घेणे कटाक्षाने टाळा. तुम्हाला सुडोल आणि सुंदर दिसण्यासाठी हे मिश्रण नक्कीच मदत करेल .

🍋 *!! मध - लिंबुपाण्याचे फायदे !!* 🍯

◆ *बद्धकोष्ठता दूर ठेवते...*
रोज सकाळी  मध - लिंबुपाण्याचे मिश्रण घेतल्यास पचनशक्ती सुधारण्यास व शौचास सुलभ होण्यास  मदत होते . गरम पाण्यामुळे आतड्यांचे कार्य  सुधारते आणि शौचातील कडकपणा दूर होऊन बद्धकोष्ठ्तेपासून आराम मिळतो .

◆ *झटपट वजन कमी करण्यास मदत करते...*
मध - लिंबुपाणी पोट साफ करण्यासोबतच तुमचे वजन कमी करण्यासही मदत करते. यामधील पेक्टिन नामक फायबर तुम्हाला प्रसन्न ठेवते. मध - लिंबू मिश्रित पाणी पोटात  अल्काईन स्थिती तयार करत असल्याने तुमचे वजन झटपट कमी करण्यास मदत होते . (पहा 'अगंबाईअरेच्चा2' साठी सोनाली कुलकर्णीने कसं घटवलं 13किलो वजन)

◆ *पचनशक्ती सुधारते...*
निरोगी आरोग्यासाठी उत्तम पचनशक्ती गरजेची असते.  मध - लिंबुपाण्याचे मिश्रण  पचनप्रक्रियेचा मार्ग सुधारण्यास मदत करते. लिंबू  यकृताला जड अन्नपदार्थापासून  पित्त निर्माण करण्यास मदत करते. तर मधातील  जीवाणू मारण्याची क्षमता शरीरात संसर्ग  होऊ देत नाही . याशिवाय हे मिश्रण शरीरातील विषारी घटक बाहेर टाकते .

◆ *मोठ्या आतड्याचे कार्य सुधारते...*
मानवी शरीरात अनेक विषारी घटकांची निर्मिती होत असते त्यामुळे कर्करोगासारखे आजार होण्याचा संभव असतो .मध - लिंबुपाण्याचे मिश्रण लहान तसेच मोठ्या आतड्यांना  चालना देते व  विषारी घटकांचा नाश करते.  आयुर्वेदानुसार हे मिश्रण  नैसर्गिकरित्या मोठे आतडे  स्वच्छ करते, अन्नातील पोषक द्रव्ये ग्रहण करते  व विषारी घटक दूर ठेवते.

◆ *उत्साहवर्धक व प्रसन्न ठेवते...*
सकाळी उठाल्यानंतरदेखील जर तुम्ही निरुत्साही राहत असाल तर मध - लिंबुपाण्याचे मिश्रण सकाळी नक्की प्या ! कारण यामधील मध तुम्हाला तत्काळ उत्साही करते तर पाण्यामुळे  मेंदूला नवीन रक्ताचा पुरवठा झाल्याने मनही प्रसन्न राहते . शरीरातील विषारी घटकांमुळे येणाऱ्या सुस्तीपणाला लिंबू दूर ठेवते त्यामुळे तुम्हाला दिवसभर प्रसन्न वाटते .

◆ *मूत्रमार्गाच्या समस्या दूर करते...*
रोगजंतूसंसर्गाचा प्रादुर्भाव टाळण्याचे महत्वाचे काम मध करते.  मध - लिंबुपाण्याचे मिश्रण शरीरातील अपायकारक घटक मुत्रामार्गे शरीरातून बाहेर टाकते. तसेच मूत्रमार्ग स्वच्छ करते. स्त्रियांमध्ये  मूत्रमार्गात इन्फेकशन होण्याचे प्रमाण अधिक असते अशावेळी हे मिश्रण नक्कीच अतिशय उपयुक्त आहे.

◆ *मुखातील दुर्गंधी दूर करते...*
लिंबातील आम्ल तत्व , मध व पाण्याबरोबर मिसळल्याने तात्काळ तोंडातील दुर्गंधी दूर होते. लिंबू तोंड स्वच्छ  करून लाळ ग्रंथी प्रवृत्त करतात व रोगजंतुंचा नाश करतो. तोंडात राहिलेल्या अन्नकणांमुळे तसेच जिभेवर तयार होणाऱ्या पांढरया थरामुळे अनेकदा दुर्गंधी येते मात्र  मध - लिंबुपाण्याचे  मिश्रण  नैसर्गिकरीत्या दुर्गंधी दूर करते.

◆ *त्वचेची कांती उजळते...*
लिंबू त्वचेची कांती उजळवण्यास  अत्यंत गुणकारी आहेच पण त्याच बरोबर लिंबामुळे होणारी रक्तशुद्धी व नंवीन रक्त पेशी निर्माण करण्याची क्षमता त्वचेचा पोत सुधारते. तर मध आणि पाणी विषारी घटक काढून त्वचेला पुनरुजीवीत करते..
---------------------------------------

No comments:

Post a Comment