Tuesday, November 10, 2020

एकलव्याला गुरुदक्षिणा म्हणून आपला अंगठा द्यावा लागला.

 

 जुन्या काळापासून मागासवर्गीयांवर अन्याय झाला, असं वाटत नाही का?


हा अत्यंत चुकीचा जातीयवादी प्रचार आहे. ऐतिहासिक वास्तव वेगळे आहे. एकलव्याचे वडील हिरण्यधनू (ज्याने सोने लुटण्यासाठी धनुष्य हातात घेतलेले आहे असा त्याचा अर्थ) ते वाटमारी करणारे लुटारु होते. तोच उद्योग मुलगा पुढे चालविणार म्हणून धनुर्विद्येचा समाजविघातक दुरुपयोग होऊ नये या साठी द्रोणाचार्यांनी त्या विद्या शिकविण्यास नकार दिला होता. परंतू त्याने जिद्दीने व निष्ठेने विद्या आत्मसात् केली व स्वतःला द्रोणाचार्यांचा शिष्य म्हणवून घेत असे. त्यावर निर्बंध राहावेत म्हणून द्रोणाचार्यांनी अंगठ्याचा उपयोग करणार नाही असे त्याचे कडून वचन घेतले होते. अंगठा कापून नव्हता घेतला. महाभारत युध्दात तो कौरवांकडून लढला व त्यांत त्याचा रणभूमीवर मृत्यु झाला. मूळ महाभारत वाचा म्हणजे कळेल. उगीच जातीय तेढ निर्माण करणारे विचार व खोट्या गोष्टी इंग्रजांनी फोडा व झोडा ह्या नीतीने पसरविले. जातीयतेमुळे आपण आपलेच नुकसान करुन घेत आहोत व देशाचा घात करीत आहोत. जाती विरहित समाज घडवून नवीन युगाची सुरुवात केली तरच आपली प्रगती होईल. जुने उगाळत तेढ निर्माण करणे थांबविणे गरजेचे आहे.

No comments:

Post a Comment