*💪विदर्भातील आश्चर्य :💪*
*व-हाडी मंडळी, तुम्ही किती बघीतले*?
*1) लोणार सरोवर*
लोणार, बुलढाणा - हे सरोवर उल्कापातामुळे तयार झालेले असून सरोवराचे पाणी खारे आहे.
*2) हनुमान मुर्ती*
नांदुरा, बुलढाणा - 105 फुट उंच हनुमान मुर्ती
*3) कचरगड गुफा*
दरेकसा, गोंदिया - ही आशिया खंडातील सर्वात मोठी नैसर्गिक गुफा आहे.
*4) डायमंड रेल्वे क्रॉसिंग*
नागपूर - येथे भारतीय रेल्वे मार्ग चारही दिशेने जोडलेला आहे.
*5) भव्य शिवलिंग*
चंद्रपूर - येथे एका मोकळ्या जागेत भव्य मुर्त्या पडून आहेत.
*6) टिपागड तलाव*
कोरची, गडचिरोली - 3000 फुट उंचीवर असलेले टिपागड तलाव.
*7) अंतरिक्ष पार्श्वनाथ जैन मंदिर*
शिरपूर जैन, वाशिम - येथे महावीर जैन यांची मुर्ती हवेत तरंगत आहे.
*8) झिरो माईल स्टोन*
नागपूर - भारताचा मध्य बिंदू
*9) चिंतामणी मंदिर*
कोथळी, बुलढाणा - येथे दोन शिवालये आहेत, सुर्योदय आणि सुर्यास्ताच्या वेळी येथील शिवलिंग सुर्यप्रकाशाने झळाळून निघतात.
*10) महिमापूर विहीर*
महिमापूर, अमरावती - येथे वास्तूकलेचा उत्कृष्ट नमुना असलेली 7 मजली पायरी विहीर आहे.
*11) अश्मयुगीन गुफा*
मोर्शी, अमरावती - या गुफेमध्ये अश्मयुगीन चित्रे काढलेली आहेत.
*12) सुर्यमंदीर*
लासूर, अमरावती - 12 महिन्याचे 12 खांब आणि त्यावर वर्तुळाकार खुले छत हे मंदिर जणू वेधशाळाच आहे.
*13) सप्तर्षी मंदिरे*
मेहकर, बुलढाणा - येथे 7 गावामध्ये 7 ऋषींचे मंदिरं आहेत. ज्यांना गुगल मॅप वरून बघितल्यास आकाशात दिसणार्या सप्तर्षी तार्यांप्रमाणे या मंदिरांची मांडणी आहे.
*14) महादेव गुफा*
गव्हाणकुंड, अमरावती - येथे गुफेत असणा-या शिवलिंगावर 12 महिने सतत नैसर्गिक जलधारा कोसळत असतात.
*15) शारंगधर बालाजी*
मेहकर, बुलढाणा - येथील बालाजी मुर्ती भव्य असून तीची उंची 11.2 फुट आहे.
*16) शमी विघ्नेश गणपती*
आदासा, नागपूर - येथील गणेश मुर्ती खूप विशाल असून तिची उंची 12 फुट आणि रूंदी 7 फूट आहे.
*🙏सौजन्य:- विदर्भ दर्शन👌*
No comments:
Post a Comment