Tuesday, November 10, 2020

रामायणानुसार जटायू हा गरुड जातीचा एक पक्षी होता. कश्यप ऋषींची पत्नी विनिता हिच्या पासून गरुड आणि अरुण असे दोन पुत्र झाले होते, अशी कथा पुराणात आहे. गरुडाचा भाऊ आणि सुर्य देव यांचा सारथी अरुण व त्याची पत्‍नी अरुणा यांना जटायू आणि संपाती अशी दोन पुत्र होती.

छायाचित्र : गुगल

या दोघांनी पण विंध्याचल पर्वताच्या पायथ्याशी आश्रम असणाऱ्या ऋषी निशाकर यांची खुप सेवा केली. या ऋषींनी त्यांना संपूर्ण दण्डकरण्यावर पहारा देऊन दण्डकरण्याचे रक्षण करा असे सांगितले होते.

एकदा इक्ष्वाकुकुलीन अयोध्याचा राजा दशरथ हे शिकारी साठी दण्डकरण्यात फिरत होते. त्यावेळेस जटायूने आपण या अरण्यात शिकार करू नये असे सांगितले. तेव्हा राजा दशरथाने मी अयोध्याचा राजा दशरथ आहे , अशी ओळख दिल्याने जटायूला खुप आनंद झाला . त्यानंतर जटायू हा राजा दशरथ यांचा परम मित्र झाला.
ज्या वेळेस रावणाचा मामा मारीच याने मायावी सुवर्ण मृगाचे रूप धारण करून राम आणि लक्ष्मण यांना आपल्या पर्णकुटी पासून दूर अरण्यात नेले. रामाने त्याचा वध केला, त्याच वेळेस रावणाने भिक्षुक गोसावी रूप घेऊन सीतेस आपल्या पुष्पक विमानातून पळवून नेत असताना त्यास रोखण्याचा प्रयत्‍न जटायूने केला. शेवटी पण रावणाने तलवारीने त्याचे पंख छाटून टाकले व त्याला जखमी अवस्थेत सोडुन दिले.

छायाचित्र : गुगल

जटायू बद्दल अजुन एक माहिती मिळते. बीड शहरातील जटाशंकर मंदिराचा संबंध थेट रामायणाशी जोडणाऱ्या दंतकथा प्रचलित आहेत.
रामायणानुसार, रावण हा रामपत्नी सीतेस पुष्पक विमानातून पळवून नेत असताना त्यास रोखण्याचा प्रयत्‍न जटायू नावाच्या गरुडाने केला, पण रावणाने तलवारीने त्याचे पंख छाटून टाकले. मृत्यूला कवटाळताना त्याने रामाला ही हकीकत सांगितली. जटायूची आठवण म्हणून बीडमधल्या त्या जागी, देवगिरीच्या यादवांच्या काळात जटाशंकर मंदिर बांधले आहे, असे म्हणतात.

जटायू हा गरुड होता की गिधाड यात मतभेद आहे.

काही अभ्यास कांनी तर जटायू हा पक्षी होता यावरच शंका उपस्थित केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार जटायू हा पक्षी नसून गिधाडांसारखा दिसणाऱ्या पिसांचा मुखवटा व पंख लावणारा गृध्र टोळीतील एक मनुष्यच होता.

हे दोनही पक्षी आज पण अस्तित्वात आहे, असे आपण म्हणु शकतो.

स्रोत :-
जटायू (रामायण) - विकिपीडिया

वाल्मीकि रामायण, किष्किंधा कांड 

No comments:

Post a Comment