*तांदळाचा भात बनवतांना अन्न संस्कार महत्त्वाचा !*
*अन्न हे पुर्णब्रम्ह*
अन्नावरचा भारतीय संस्कार
कुकरमधे भात बनवला, तर त्यात चिकटपणा तयार होतो. पाणी भातात मुरते.
जिथे पाणी मुरते तिथे गडबड असतेच ना !
तांदळाच्या दुप्पट पाणी घालून कुकरमधे २५० सेंटीग्रेडला १५ ते २० मिनिट शिजवला, तर त्यातील जीवनसत्वे जीवंत राहतील ?
एका बाजूने गॅस वाचेल, त्यापेक्षा अधिक रक्कम डॉक्टरांना कायमस्वरूपी द्यावी लागते !
अग्निसंस्कार चुकीचा झाला ना ! कसा ?
आपली भात करण्याची पारंपरिक पद्धत काय आहे ?
त्यातील तापमान अभ्यासूया. प्रथम तांदळाच्या १६ पट पाणी १०० सेंटीग्रेडला उकळवून घ्यावे. आधीच रोवळीमध्ये धुवून घेतलेले तांदुळ त्यात ओतावे.
उकळत्या पाण्यात ८ ते १० मिनिटे तांदुळ शिजवावा.
त्यानंतर एक शीत काढून तो आतपर्यंत शिजला आहे, हे पाहून अधिकचे पाणी काढण्यासाठी हा भात चाळणीवर ओतावा.
शिजलेले पाणी, म्हणजचे पेज काढून टाकावी आणि भात पुन्हा पातेल्यात ओतून केवळ ५० ते ६० सेंटीग्रेडला १० मिनिटे झाकण टाकून ठेवावा.
भात मस्त फुलतो.
*वेगळी केलेली पेज प्यायची हं.*
टाकायची नाही.
पोषक अंश (आजच्या भाषेत, कार्बोहायड्रेटस्) त्याच्यातच आहेत ना !
आता या पद्धतीच्या भातात, भात आणि पेज मिळून सगळी जीवनसत्वे शाबूत असतील ना !
अग्निचा संस्कार यथायोग्य झाल्याने आणि पाणी काढून टाकल्याने भात पचायला हलका आणि पेजही पचायला हलकी.
तांदळाच्या १६ पट पाणी,
८ पट पाणी,
४ पट पाणी आणि दुप्पट पाणी घालून केलेल्या भाताला अनुक्रमे मंड, पेया, विलेपी आणि ओदन अशी नावे आहेत.
म्हणजेच निवळ, पेज, आटवल आणि भात.
अशा पेज काढलेल्या भाताने पोट अजिबात सुटत नाही आणि क्लेद वाढवणारा चिकट भाग योग्य वेळी वेगळा केल्याने शरीरातील साखरही वाढत नाही.
कोकणात जेवणात भात अधिक प्रमाणात खातात; पण कोणाचे पोट सुटलेले बघितलेले नाही.
याउलट कुकरचा भात चालू केल्यापासून पोट सुटायला लागले आहेत आणि रक्तातील साखर देखील वाढायला लागली असल्याचे दिसू लागले आहे.
आता सांगा, कुकरच्या भातात आणि पेज काढून केलेल्या भातात भूमी-आकाशाएवढा भेद असेल कि नाही ?
हा आहे अन्नावरच्या अग्निचा भारतीय संस्कार.
भात खाणे वर्ज्य नाही , आपण
चुकीच्या पद्धतीने भात खातो,
म्हणून वजन वाढते..
ह्या भारतीय पद्धतीने भात बनवा..
जेवन बनवतांनाही मनात सात्विक भाव ठेवा.
ईश्वराचे स्मरण करा..
ज्यांच्या साठी अन्न शिजवताय., त्यांच्या विषयीचा प्रेमभाव जाग्रुत ठेवा .. हे प्रेमच अन्नाला रूची प्रदान करते..
सतत आदळआपट करणा-या, अपशब्द वापरणा-याच्या हातून तयार झालेले अन्न तामसिक बनते. व ते अन्न खाणारी व्यक्तीही तामसिक बनते...
मन शांत असेल तरच पदार्थात योग्य प्रमाणात अन्नपदार्थ टाकले जातात, अशांत मन असेल तर प्रमाण चुकते.. कधी मिठच पडत नाही , तर कधी दुप्पट पडते, मसाला डबल पडतो , तिखटाते प्रमाण बिघडते .. असो..
शांत रहा ..
आनंदी रहा..
मस्त रहा ..
प्रसन्न रहा ..
आणि जेवन बनवा..
बनवलेल्या अन्नाचा नैवेद्य प्रथम प्रभुला अर्पण करा..
आणि मग मनोमन त्या अन्नदात्याचे आभार मानून ईतरांना वाढा, स्वतःही खा..
हे केवळ उदरभरण नसून हा
कर्म यज्ञ आहे , जो परमेश्वाने तुमच्या हातून करविला आहे.
बनविणारा ही तोच आणि खाणाराही तोच..
*आपण निमित्तमात्र*
No comments:
Post a Comment