Wednesday, November 18, 2020
! ! यह भी कट जाएगा ! !
Thursday, November 12, 2020
उपयोगी नारळ तेल
प्राचीन चिनी औषधानुसार पायाखाली सुमारे 100 एक्युप्रेशर पॉइंट असतात.
ते अवयव दाबून आणि मालिश करून अनेक आजार देखील बरे होतात.
यालाच फूट रिफ्लेक्सोलॉजी असे म्हणतात…
- एका दक्षिण भारतीय महिलेने सांगितले माझ्या आजोबांचे वयाच्या 87 व्या वर्षी निधन झाले, पाठदुखी नाही, सांधेदुखी नाही, डोकेदुखी नाही, दात दुःखी नाही, एकदा त्यानी सांगितले की मंगलोरमध्ये राहत असताना त्याना एक म्हातारा भेटला. झोपताना तो पायाच्या तळांवर तेल लावण्यासाठी त्यांनी त्याना सल्ला दिला होता. आणि तेंव्हापासून हा उपचार त्यांचा स्वास्थ्याचा एकमेव स्त्रोत आहे. त्यामुळे त्याना कधीही कोणताही त्रास झाला नाही.
- मणिपाल येथील एका विद्यार्थ्याने सांगितले की माझ्या आईने माझ्या पायाखाली नारळ तेल लावण्याचा आग्रह धरला. तो म्हणाला की लहान असताना त्याची दृष्टी क्षीण झाली होती. जेव्हा तिने ही प्रक्रिया सुरू केली व त्या नंतर त्याच्या डोळ्याचा प्रकाश हळूहळू पूर्णपणे आणि आरोग्यासाठी चांगला झाला.
- उडुपी येथील एक गृहस्थ श्री. कामत जे व्यापारी आहेत त्यानी सांगितले की मी सुट्टीसाठी केरळला गेलो होतो.तेथील एका हॉटेलच्या Room मध्ये मला झोप येत नव्हती मी उठून बाहेर फेर फटका मारु लागलो, रात्री बाहेर बसलेला म्हातारा पहारेकरी मला विचारू लागला, "काय झाले साहेब ?" मी म्हणालो मला झोप येत नाही! तो हसला आणि म्हणाला, "तुमच्या कडे नारळ तेल आहे का?" मी म्हणालो नाही, तो जाऊन नारळ तेल घेऊन आला आणि म्हणाला, "आपल्या पायाच्या तळव्याना काही मिनिटे मालिश करा." मग मात्र मी शांत झोपलो.
- रात्री झोपण्यापूर्वी पायांच्या तळव्यावर नारळ तेलाने मालिश केल्यास अधिक शांत झोप लागते आणि थकवा कमी होतो .
मी माझ्या लहान मुलिच्या पायाच्या तळांवर नारळ तेलाने मालिश करतो, जे तिला खूप आनंदी आणि निरोगी ठेवते.
- पाय दुखत असल्यास रात्री झोपायला जाण्यापूर्वी दररोज 2 मिनिटांसाठी नारळाच्या तेलाने पायांच्या तळांची मालिश करा. या प्रक्रियेमुळे पायाच्या दुखण्या पासुन त्वरित आराम मिळेल.
- पायावर सूज येत असल्यास देखिल मालिश करणे गुणकारी ठरते.
- छान झोप घेण्यासाठी झोपेच्या गोळ्यांपेक्षा ही टीप चांगली आहे.
- थायरॉइड पायाची जळजळ यावर रामबाण उपाय म्हणजे रोज रात्री झोपताना पायाच्या तळाला मालिश करणे.
- मुळव्याध गुडघादुखी पाठदुखी यावर देखिल रामबाण उपाय म्हणजे तळव्यांची मालिश करणे.
“आपणास फक्त कॉकॉनट ऑईलच संपूर्ण पायांवर लावायचे आहे..
विशेषत:डाव्या तळव्यांवर तीन मिनिटे आणि उजव्या पायाच्या तळव्यावर तीन मिनिटे..
झोपेच्या वेळी पायांच्या तळांवर मालिश करणे सुरू करा आणि त्याच प्रकारे मुलांचा सुद्धा पायावर मालिश करा आयुष्यभर याचा एक नित्य कर्म बनवा नंतर निसर्गाची परिपूर्णता पहा तुम्ही आयुष्यभर अनेक आरोग्यदायी फायदे अनुभवू शकता.
Tuesday, November 10, 2020
रामायणानुसार जटायू हा गरुड जातीचा एक पक्षी होता. कश्यप ऋषींची पत्नी विनिता हिच्या पासून गरुड आणि अरुण असे दोन पुत्र झाले होते, अशी कथा पुराणात आहे. गरुडाचा भाऊ आणि सुर्य देव यांचा सारथी अरुण व त्याची पत्नी अरुणा यांना जटायू आणि संपाती अशी दोन पुत्र होती.
छायाचित्र : गुगल
या दोघांनी पण विंध्याचल पर्वताच्या पायथ्याशी आश्रम असणाऱ्या ऋषी निशाकर यांची खुप सेवा केली. या ऋषींनी त्यांना संपूर्ण दण्डकरण्यावर पहारा देऊन दण्डकरण्याचे रक्षण करा असे सांगितले होते.
एकदा इक्ष्वाकुकुलीन अयोध्याचा राजा दशरथ हे शिकारी साठी दण्डकरण्यात फिरत होते. त्यावेळेस जटायूने आपण या अरण्यात शिकार करू नये असे सांगितले. तेव्हा राजा दशरथाने मी अयोध्याचा राजा दशरथ आहे , अशी ओळख दिल्याने जटायूला खुप आनंद झाला . त्यानंतर जटायू हा राजा दशरथ यांचा परम मित्र झाला.
ज्या वेळेस रावणाचा मामा मारीच याने मायावी सुवर्ण मृगाचे रूप धारण करून राम आणि लक्ष्मण यांना आपल्या पर्णकुटी पासून दूर अरण्यात नेले. रामाने त्याचा वध केला, त्याच वेळेस रावणाने भिक्षुक गोसावी रूप घेऊन सीतेस आपल्या पुष्पक विमानातून पळवून नेत असताना त्यास रोखण्याचा प्रयत्न जटायूने केला. शेवटी पण रावणाने तलवारीने त्याचे पंख छाटून टाकले व त्याला जखमी अवस्थेत सोडुन दिले.
छायाचित्र : गुगल
जटायू बद्दल अजुन एक माहिती मिळते. बीड शहरातील जटाशंकर मंदिराचा संबंध थेट रामायणाशी जोडणाऱ्या दंतकथा प्रचलित आहेत.
रामायणानुसार, रावण हा रामपत्नी सीतेस पुष्पक विमानातून पळवून नेत असताना त्यास रोखण्याचा प्रयत्न जटायू नावाच्या गरुडाने केला, पण रावणाने तलवारीने त्याचे पंख छाटून टाकले. मृत्यूला कवटाळताना त्याने रामाला ही हकीकत सांगितली. जटायूची आठवण म्हणून बीडमधल्या त्या जागी, देवगिरीच्या यादवांच्या काळात जटाशंकर मंदिर बांधले आहे, असे म्हणतात.
जटायू हा गरुड होता की गिधाड यात मतभेद आहे.
काही अभ्यास कांनी तर जटायू हा पक्षी होता यावरच शंका उपस्थित केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार जटायू हा पक्षी नसून गिधाडांसारखा दिसणाऱ्या पिसांचा मुखवटा व पंख लावणारा गृध्र टोळीतील एक मनुष्यच होता.
हे दोनही पक्षी आज पण अस्तित्वात आहे, असे आपण म्हणु शकतो.
स्रोत :-
जटायू (रामायण) - विकिपीडिया
वाल्मीकि रामायण, किष्किंधा कांड
एकलव्याला गुरुदक्षिणा म्हणून आपला अंगठा द्यावा लागला.
हा अत्यंत चुकीचा जातीयवादी प्रचार आहे. ऐतिहासिक वास्तव वेगळे आहे. एकलव्याचे वडील हिरण्यधनू (ज्याने सोने लुटण्यासाठी धनुष्य हातात घेतलेले आहे असा त्याचा अर्थ) ते वाटमारी करणारे लुटारु होते. तोच उद्योग मुलगा पुढे चालविणार म्हणून धनुर्विद्येचा समाजविघातक दुरुपयोग होऊ नये या साठी द्रोणाचार्यांनी त्या विद्या शिकविण्यास नकार दिला होता. परंतू त्याने जिद्दीने व निष्ठेने विद्या आत्मसात् केली व स्वतःला द्रोणाचार्यांचा शिष्य म्हणवून घेत असे. त्यावर निर्बंध राहावेत म्हणून द्रोणाचार्यांनी अंगठ्याचा उपयोग करणार नाही असे त्याचे कडून वचन घेतले होते. अंगठा कापून नव्हता घेतला. महाभारत युध्दात तो कौरवांकडून लढला व त्यांत त्याचा रणभूमीवर मृत्यु झाला. मूळ महाभारत वाचा म्हणजे कळेल. उगीच जातीय तेढ निर्माण करणारे विचार व खोट्या गोष्टी इंग्रजांनी फोडा व झोडा ह्या नीतीने पसरविले. जातीयतेमुळे आपण आपलेच नुकसान करुन घेत आहोत व देशाचा घात करीत आहोत. जाती विरहित समाज घडवून नवीन युगाची सुरुवात केली तरच आपली प्रगती होईल. जुने उगाळत तेढ निर्माण करणे थांबविणे गरजेचे आहे.