Tuesday, July 28, 2020

नागपूर चे ताजुद्दीनबाबा


श्री गणेशाय नमः !ओम नमः शिवाय !ओम ताजुद्दीनय नमः!

मी तीन दिवसान आधीच सद्गुरू संत श्री ताजुद्दीन बाबा यांच्या लिलामृताचे पठण समाप्त केले आणि दुसऱ्या दिवशीच मला तुमचं प्रश्न दिसलं त्यामुळे बाबांबद्दल काय सांगू नी काय नाही असं झाल …. त्यामुळे मी pending वर ठेवलं होतं , परंतु बाबांनीच मला आज्ञा केली आणि मी उत्तर द्यायला आले.

तर तुमच्या उत्तराकडे वळूया☺️।श्री संत ताजुद्दीन बाबांचा जन्म 26 जानेवारी 1861 ला पहाटे कामठी येथे झाला। त्यावेळी एकीकडे मंदिर च्या आरतीचा आवाज होता एकीकडे मस्जिद मधून अल्लाह ची अजाण सूरु होती आणि एकीकडे ख्रिश्चन च्या चर्च मधील घंटानाद☺️.लहानपणीच त्यांच्यावरील आईवडिलांचे छत्र हरवले म्हणून आजी आणि मामांनी त्यांचे संगोपन केले . काही काळाने घर चालावं बा म्हणून मामांनी त्यांना नोकरी करायचे सांगितले….उंचपुरे आणि धडाधिप्पाड असल्यामुळे त्यांना मिलिटरी मध्ये समाविष्ट करण्यात आले . एकदा कामठी च्या जंगलात अब्दुल्ला शाह कादरी यांनी बाबांना काही फळं दिली आणि सोबतच आपले दैवी तेज दिले. त्यानंतर बाबांची बदली सागर येथे झाली….तेथे त्यांना जंगलात एक संत दिसले । बाबा त्यांच्याकडे आकर्षित झाले , ते दिवसभर मिलिटरी चे काम करायचे आणि रात्र भर त्या संत जवळ ध्यान धारणा करायचे. इथूनच ते गंभीर आणि संतप्रवृत्ती ने वागू लागले. त्यांना सांसारिक जीवन नको होते…त्यांना आत्मबोध झाला आणि तडकफडकी मिलिटरी चा राजीनामा दिला. आजीने बाबांना परत नेले तिकडे बाबा नागड्या अवस्थेत भटकायचे , एकटेच ध्यानमग्न राहायचे ..लोक त्यांना पागल म्हणून गोटे मारायचे पण बाबा आपल्याच विश्वात असायचे . आता बाबांच्या लीला सुरू झाल्या . ते जेवन सुद्धा करीत नव्हते म्हणून आजी जेवण घेऊन आली , बाबा म्हणाले "हम तो खाते लाडू पेढे" आणि त्यांनी रस्त्यावरून गोटे उचलुन कचरकचर खाल्ले. लोकांना बाबांचे तेज आणि चमत्कार दिसू लागले आणि ते बाबांना देव मानायचे , बाबा जिकडे जातील तिकडे लोकांचा घोळका असायचा .. बाबा कधी आपल्या अंगावरील वस्त्र फेकयचे आणि भक्त तेच प्रसाद समजायचे . त्यांची लोकप्रियता वाढू लागली आणि लोकांचा गराडा पण … पण जे तिन्ही लोकांचे स्वामी आहे अशा संतास एकटेपण हवे होते… म्हणून एकदा ते इंग्रजांच्या छावणीमध्ये नागडेच गेले। महिलांनी बघुन आरडाओरड केली आणि त्यांना नागपूर येथील पागलखाण्यात नेण्यात आले. तिथे बाबांना एकांत मिळाला. पण दुसऱ्याच दिवशीच ज्या शिपायाने त्यांना पागलखाण्यात नेले त्यांना परत बाबा छावणीत दिसले म्हणून लगेच वरिष्ठांना कळविले आणि तो पागखाण्यात बघतो तर बाबा तिथेच होते ! पुन्हा परत येतो तर बाबा छावणीत ,हे बघून इंग्रजांने बाबांचे चरण पकडून क्षमा मागितली. त्यानंतर अनेक इंग्रज बाबांचे भक्त झालेत. पागलखाण्यात बाबांनी अगणित चमत्कार दाखविले, एका मुस्लिमाला हजला गेला असताना काब्याला दर्शन दिले आणि नागपूर येथे येण्यास सांगितले तर त्यांना आश्चर्य झाला कारण पागलखाण्यात बंदिस्त असतानाही काब्यात कसे दर्शन दिले। एका हिंदू भक्ताला श्रावण सोमवारी बाबांनी भगवान शंकर च्या रुपात दर्शन दिले. एकदा त्यांच्यात गळ्यामध्ये नाग दिसला , भक्त घाबरलेत तर तो नाग आपोआप अदृश्य झाला . मग बाबा नागपूर येथील राजा शिवछत्रपती चे वंशज क्षत्रिय कुलावंत श्री राघोजी महाराज यांच्या स्वप्नात दृष्टांत दिले की आता येणे बा तुझे घरी . परंतु राघोजी राजांकडे एक संत मुक्कामास आल्यामुळे बाबा म्हणाले "एक म्यांन मे दो तलवार नही रे " याचा अर्थ राघोजीना नंतर कळला. दरम्यान बाबा नागपूर जवळच वाकी येथे वास्तव्यास गेले. तेथे बाबांनी अनंत लीला दाखविल्या . येथे बाबानी अनेकांना न्याय दिला म्हनून हायकोर्ट आहे, बाबांचा मदरसा आहे ,बाबांचा दवाखाना आहे जिथे साधी माती देऊन बाबांनी अनेकांचे दुर्धर रोग आजार बरे केले ,आजही लोक इथे जातात, बाबांचा डेरा आहे जिथे चिंचेच्या झाडाखाली बाबा ध्यानमग्न असायचे , मिठाणीम आहे…. एक कडुनिंबाचा झाड ज्याची अरधी पाने गोड आनि अर्धी कडु आहे म्हणून मिठाणीम . बाबानी दोन मैत्रिणींना लाडू दिले ज्यांना दहा वर्षापासुन मुलबाळ नव्हते. एकीनी मनोभावे प्रसाद समझुन खाल्ले तर एकींनि विचार केला की हा तर मुस्लिम संत आहे याचं उष्ट मी कस खाऊ आणि रेतीत टाकून दिला. एकीला पुत्र झाला ती दर्शनाला गेली , दुसरी म्हणाली बाबा , "कुठे माझे बाळ".. आणि रडू लागली ,बाबा करुणानिधान ,त्यांना पाझर फुटला आणि म्हणाले" रेत मे डाला था निकाल ले वहा से"त्यानंतर 9 महिणयांनी तिला पुत्ररत्न प्राप्त झाला. दुसऱ्या देशातून मुस्लीम आले बाबांची परीक्षा घेण्या.. तेव्हा बाबांनि बोटाच्या इशाऱ्यावर आकाशातील सूर्याचे दोन तुकडे केले आणि हा प्रसंग उपस्थित सर्व भाविकानि बघितला. एका लनगड्याला कमरेवर लाथ मारली आणि तो चालू लागला . बाबांची प्रिय गायिका जी रोज कव्वाली म्हणायची तिला मेल्यानंतर परत जिवंत केले. शेरु नामक कुत्र्याला जिवंत केले जो भाविकांना बाबनपर्यंत घेऊन जायचा. रस्त्याने जात असताना एका मूलाला हार फेकून दिला त्याने तो क्रिकेट च्या बॅट ला लावला आणि कैंकैया नायडु प्रसिध्द झाला. तसेच हिदायतुलला च्या घरी काही फकीरांना जाण्यास सांगितले आणि हिदायतुलला च्या वडीलास सांगितले हाथ मे कलम दो छोटे बेटे को आणि तो पुढे जाऊन भारताचा सर्वोच्च न्यायालयाचा न्यायमूर्ती झाला तसेच दोन वेळा उपराष्ट्रपती आणि एकदा हंगामी राष्ट्रपती झाले. वर्षानुवर्षे रेल्वे स्थानकावर भीक मागनाऱ्याला रातोरात चालते केले ,त्यांनी सांगितले बाबांनि रात्री स्वप्नात दर्शन दिले… हा वृत्त "टाईम्स"च्या वृत्तपत्रात झळकला.कॅन्सर च्या रुग्णाला वरण भात देउन बरे केले . एक आई आपल्या बाळाला घेऊन दर्शनाला गेली ,बाबांची नजर लगेच बाळावर गेली आणि आपल्या तोंडातील पानाचा विडा बाळाच्या मुखात टाकला आणि म्हणाले"हो जी अम्मा तेरा ये बच्चा तो अल्ला का तोता है" , हे बाळ म्हणजेच विदर्भाचे महान गायक वसंतराव देशपांडे होय. तसेच एकदा बाबा महाराज बाग कडे फिरत असताना नागपूर अधिवेशनासाठी आलेले एक महान नेते बाबांची किर्ती ऐकून दर्शनासाठी गाडीतून उतरले…बाबांनी त्यास म्हटले " हाओ जी चलाओ खूप चक्कर" ते नेते म्हणजे राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि पुढे जाऊन यांनी चरखा च्या बळावर भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले. एक भक्त बाबांच्या सेवेत असताना काशी जायची परवानगी मागत होता, बाबा नाही म्हणाले तरीही तो न सांगता गेला. तिथे त्याला शंकर भगवान च्या पिंडीवर बाबा ध्यानमग्न बसलेले दिसले , असे दिसताच तो वाकीला परत आला तर बाबा क्रोधीत होऊन गुप्तांग हातात पकडून म्हणाले " क्यु रे देख लिया काशी"…. असा हा संत तिन्ही जगाचा स्वामी योगिराणा ताजुद्दीन बाबा. मुस्लीम धर्मात जन्म घेतला पण आयुष्य भर हिंदू च्या घरी राहले आणि ऐक्याचा संदेश दिला. मुंबई मध्ये हिंदु मुस्लिम दंगे झाले तेव्हा मुस्लिम लोक बाबांच्या चरणी आले आणि म्हणाले हिंदू लोक हमे मर देणगे, यावर बाबा म्हणाले सच्चे मुस्लिम को कोई नही मार सकता… जो मर रहे है वो तो पापी है , अधर्मी है ऐसे लोगो का कोई धर्म नाही… . समाधी नंतर सुद्धा बाबांनी अनेक लीला दाखविलया. असे हे थोर सूफी संत ताजुद्दीन बाबा , यांच्या दर्शनाला नित्य जगभरातून हिंदू आणि मुस्लिम येत असतात आणि तसेच बाबांनी एक ख्रिश्चन भक्ताला येशू ख्रिस्त च्या प्रतिमेमध्ये आपले रूप दाखवले तसेच जैन भक्ताला सुध्दा दर्शन दिले ,नागपूरातील ताजबाग हे सर्व धर्मीयांसाठी श्रद्धेचे स्थान आहे , बाबांना नागपूरचा राजा असे समबोधले जाते तसेच दरवर्षी त्यांचा शाही संदल निघतो आणि हजारो सर्वधर्मीय भाविक त्यांमध्ये असतात… अशा संतास मी विनम्रपणे नतमस्तक होऊन वंदन करते। ओम ताजुद्दीनय नमः।


--

No comments:

Post a Comment