Monday, February 20, 2017

विवाहित स्त्रीने लिहीलेली सुंदर कविता

हसा व वाचा
विवाहित स्त्रीने लिहीलेली सुंदर कविता
👇
जरा बऱ नसेल तर :-

जरा बऱ नसेल तर नवरे
कित्ती मदत करतात,

तु झोप आता म्हणतात आणी
मग दहा वेळा उठवतात.

चहा कशात आहे,
साखर संपलीये का,
गाळणं कुठाय?

सगळे डब्बे ओट्यावरच
मुक्कामाला येतात.

जरा बरं नसेल तर
नवरे कित्ती मदत करतात

टेबलावरची वर्तुळ सांगतात
किती झालाय चहा,

आवरताना म्हणतात
तू झोपुनच रहा,

पुसायचे फडके म्हणुन
नवाकोरा नॅपकीन घेतात.

जरा बऱ नसेल तर
नवरे कित्ती मदत करतात

दुध जातंच ऊतु
जर केलं "वर्क फ्रॉम होम"
आणि ऑफिसला गेले तर
फोन वर फोन.

चौकशीच्या नादात
बायकोची झोप विसरतात.

जरा बरं नसेल तर
नवरे कित्ती मदत करतात

खरकटी भांडी आणि
पिम्पाखाली तळे,

कुकरच्या अगणित शिट्या
आणि पोळी भाजीची पार्सले.

यांच्या दर्शनानेच बहुदा
आजारपणे पळतात.

जरा बरं नसेल तर
नवरे कित्ती मदत करतात

रागावू नका, एखादा नवरा
असेलही जगावेगळा.

सन्माननीय अपवादां मधे
स्वतःला वगळा.

पण असे नवरे नेहमी दुसऱ्या
बायकांनाच मिळतात

कि पलीकडचे रंग
जरा जास्तच हिरवे दिसतात.                                             

म्हणे नवरे मदत करतात.😂😂😂😂😂😂😂

No comments:

Post a Comment