प्रश्न -- "खर्रा'' या विषयावर सविस्तर निबंध लिहा.
गुण १५
उत्तर--
खर्रा हे एक नैसर्गिक खाद्य आहे,
ख-र्यामुळे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत.
भारतात दर १० व्यक्तींमागे ३ माणसे खर्रा खातात.
विदर्भात तर दर १० मागे ९ जण खर्रा खातात.
खर्रा खाणे ही एक कला समजली जाते, वडिलधा-या माणसांना सन्मान देण्यासाठी खर्रा दोन मिनिटे मागे लपवून ठेवावा. तरी त्यांच्या लक्षात आल्यास ते मागण्याची शक्यता असते.
खर्रा घोटणे हे सुद्धा अतिशय कलात्मक काम समजले जाते,
ख-र्याशिवाय जीवन अपूर्ण आहे,
सध्या खर्रा सर्वत्र मिळतो आगामी काळात माँल मध्ये सुद्धा मिळेल,
खर्रा न खाल्यास मन अस्वस्थ होते, तसेच शौचास होत नाही,
खर्रा कुठेही लपवून ठेवता येतो तसेच उधारीवर कोणीही देऊ शकतो .ख-र्याला पुण्याकडच्या भाषेत मावा म्हणतात. पण हे अतिशय पाचकळ नाव झाले. त्यात ख-र्याची मजा नाही.
खर्रा शेअर करणारे लोक अतिशय पक्के मित्र असतात,
ख-र्यामुळे तन मन प्रफुल्लित होते,खाणा-याच्या भाषेत सांगायचे म्हटलं तर "करंटच लागत नाही " ब्रम्हानंदी टाळी लागते.
खर्रा खाणारी माणसे अतिशय हुशार आणि विद्वान असतात,
एकदा का खर्रा ताेंडात गेला....
साक्षात् परमेश्वर जरी अमृत घेऊन आला तरी खर्रा थुंकला जात नाही. त्याला सुद्धा "आत्ताच खर्रा खाल्ला प्रभु " हेच उत्तर मिळते.
पानटपरीवर खर्रा खातांना ईतर खर्राप्रेमीकडुन जी माहीती मिळते ती जगातल्या कुठल्याही विश्वकाेषात मिळत नाही.
खर्रा खाल्ल्यावर कुणी कुणी आस्वाद घेताना जे माैनव्रत पाळतात तेव्हा ते खुप वर पाेचलेले तपस्वीच वाटतात.
कट्टर खर्रा खाणारा सहसा बिडी, सिगरेट, तंबाखू, पान, असले वाईट व्यसन करीत नाही.
कमी खर्चीक असलेला खर्रा फक्त ७ रुपयांपासून ते ३० रुपयांपर्यंत सुद्धा मिळतो,
घोटा खर्रा .....
😄😄😄😄😄😄😄👏
गुण १५ पैकी १५
No comments:
Post a Comment