Friday, August 26, 2016

मृत्युभोज

*मृत्युभोज/तेहरवीं/रस्म क्रिया पर भोजन करना सही है क्या..????*

जिस परिवार मे विपदा आई हो उसके साथ ईस संकट की घड़ी मे जरूर  खडे़ हो और तन,मन,और घन से सहयोग करे और मृतक भोज का बहिष्कार करे।
*शास्त्रो में भी लिखा है*
✍ महाभारत युद्ध होने का था, अतः श्री कृष्ण ने दुर्योधन के घर जा कर युद्ध न करने के लिए संधि करने का आग्रह किया, तो दुर्योधन द्वारा आग्रह ठुकराए जाने पर श्री कृष्ण को कष्ट हुआ और वह चल पड़े, तो दुर्योधन द्वारा श्री कृष्ण से भोजन करने के आग्रह पर कहा कि

’’सम्प्रीति भोज्यानि आपदा भोज्यानि वा पुनैः’’

हे दुयोंधन - जब खिलाने वाले का मन प्रसन्न हो, खाने वाले का मन प्रसन्न हो, तभी भोजन करना चाहिए।
*लेकिन जब खिलाने वाले एवं खाने वालों के दिल में दर्द हो, वेदना हो।*
तो ऐसी स्थिति में कदापि भोजन नहीं करना चाहिए।

हिन्दू धर्म में मुख्य 16 संस्कार बनाए गए है, जिसमें प्रथम संस्कार गर्भाधान एवं अन्तिम तथा 16वाँ संस्कार अन्त्येष्टि है। इस प्रकार जब सत्रहवाँ संस्कार बनाया ही नहीं गया तो सत्रहवाँ संस्कार तेरहवीं संस्कार कहाँ से आ टपका।

इससे साबित होता है कि तेरहवी संस्कार समाज के चन्द चालाक लोगों के दिमाग की उपज है।
*किसी भी धर्म ग्रन्थ में मृत्युभोज का विधान नहीं है।*
बल्कि महाभारत के अनुशासन पर्व में लिखा है कि मृत्युभोज खाने वाले की ऊर्जा नष्ट हो जाती है। लेकिन जिसने जीवन पर्यन्त मृत्युभोज खाया हो, उसका तो ईश्वर ही मालिक है।
इसी लिए महार्षि दयानन्द सरस्वती,, पं0 श्रीराम शर्मा, स्वामी विवेकानन्द जैसे महान मनीषियों ने मृत्युभोज का जोरदार ढंग से विरोध किया है।

जिस भोजन बनाने का कृत्य जैसे लकड़ी फाड़ी जाती तो रोकर, आटा गूँथा जाता तो रोकर एवं पूड़ी बनाई जाती है तो रोकर यानि हर कृत्य आँसुओं से भीगा।
ऐसे आँसुओं से भीगे निकृष्ट भोजन एवं तेरहवीं भेाज का पूर्ण रूपेण बहिष्कार कर समाज को एक सही दिशा दें।

जानवरों से सीखें,

जिसका साथी बिछुड़ जाने पर वह उस दिन चारा नहीं खाता है। जबकि 84 लाख योनियों में श्रेष्ठ मानव,
जवान आदमी की मृत्यु पर हलुवा पूड़ी खाकर शोक मनाने का ढ़ोंग रचता है।

इससे बढ़कर निन्दनीय कोई दूसरा कृत्य हो नहीं सकता।
यदि आप इस बात से
सहमत हों, तो आप आज से *"संकल्प लें कि आप किसी के मृत्यु भोज को ग्रहण नहीं करंगे"*
🙏�यही निवेदन है 🙏�
*मृत्युभोज समाज में फैली कुरुति है व् विकसित समाज के लिये अभिशाप 🙏�है।*
✍ *अगर आप भोजन करवाना ही चाहते है तो गरीब, लाचार, बेसहारा को करवा कर मृत प्राणी की आत्मा को शांति पहुंचा सकते है एवं पुण्य के भागी बन सकते है* 🇮🇳
🚩❗जय माता दी ❗🚩                                        🙏🏽  *जडेजा स्वदेशी*🙏🏽

उपकराचे महत्व

एकदा एक वाघ आणि वाघीण आपल्या पिलांना गुहेत सोडून शिकारीसाठी दूर जंगलात जातात. खूप दिवस पर्यंत ते परत आलेच नाही. इकडे पिलांना खूप भूक लागली. कलकल ऐकून एका बकरीला त्यांची दया आली. तिने वाघिणीच्या पिलांना आपले दूध पाजले. पिलांच्या जीवात जीव आला. आता बकरी रोज येऊन त्यांना दूध पाजू लागली. एक दिवस पिले पोट भरल्यानंतर मस्ती करू लागली. तेव्हड्यात तिथे वाघ आणि वाघीण आले. बकरीला पाहून आयती शिकार मिळाल्याच्या आनंदात तिच्यावर वाघ झडप घालणार इतक्यात पिले म्हणाली, हिने आम्हाला दूध पाजून मोठे केलेय. ही नसती तर आम्ही मरून गेलो असतो. हिचे आपल्यावर खूप उपकार आहेत. तुम्ही तिला मारू नका. मुलांचे ऐकून वाघ खुश झाला आणि तिला कृतद्न्यतेने म्हणाला. आम्ही तुझे हे उपकार विसरणार नाही. आता तू स्वतंत्रपणे आनंदाने जंगलात एकटी सुद्धा वावरू शकतेस. तुला कुणीही त्रास देणार नाही.
आता बकरी मोठ्या धाडसाने जंगलात कुठेही वावरू लागली. एकदा तर बकरीला वाघाच्या पाठीवर बसून उंच झाडांची पाने खातांना एका पक्षाने पाहिले आणि कुतूहलाने त्याने बकरीला त्याबद्दल विचारले. बकरीने त्या मोठ्या पक्षाला सर्व हकीकत सांगितली. उपकाराचे महत्व पक्षाच्या लक्षात आले.
आपण पण असेच महान कार्य करायचे असे पक्षाने ठरवले.
एकदा पक्षी उडत असतांना त्याला काही उंदराची पिले दलदलीत फसलेली दृष्टीस पडतात. ती बाहेर पडायचा प्रयत्न करत असतात पण अधिकच खोल जात असतात. पक्षी त्यांना अलगद बाहेर काढतो. उंदराची पिले ओली झालेली असतात. थंडीने कुडकुडत असतात. पक्षी त्यांना आपल्या पंखात घेतो. चांगली ऊब देतो. थोड्या वेळाने आपल्या घरट्या कडे जाण्यासाठी निघतो. उंदराच्या पिलांचा निरोप घेतो. उडायचा प्रयत्न करतो पण काही केल्या त्याला उडता येईना कारण त्याचे पंख पिलांनी कुर्तडलेले असतात.
चरफडत चरफडत कसाबसा पक्षी तिथून निघतो.
बकरीला भेटून विचारतो, "तू पण उपकार केलेस मी पण उपकार केले. पण फळ दोघांना वेगवेगळे कसे मिळाले?"
बकरी हंसली आणि गंभीरपणे म्हणाली
"उपकार पण वाघासारख्यावर करावेत उंदरासारख्यावर नाही कारण असे लोक नेहमी ते विसरण्यात धन्यता मानतात आणि बहादूर लोक ते लक्षात ठेवतात"
               🙏🏻🙏🏻🙏🏻

Friday, August 12, 2016

भारतीय

मला आवडलेला हा लेख नक्की वाचा....

विमान प्रवासात भेटलेल्या एका अमेरीकन माणासाचे उद्गार फार सूचक आहेत. तो म्हणाला “मला तुम्हा भारतीय लोकांमधे एक मोठी विचित्र गोष्ट आढळते. तुम्हा लोकांना आपल्या देशावर टिका करण्यामधे कमीपणा वाटत तर नाहीच, उलट एकप्रकारचा आनंद आणि अभिमान वाटतो. जगात असे कुठेच घडत नाही. अगदी आफ्रिकेच्या जंगलातुन आलेला माणूस सुध्धा आपल्या जंगलाला एव्हडी नांवे ठेवत नाही. अमेरिकेमधे आपल्या देशाला नांवे ठेवणे हे आपल्या आईला नांवे ठेवण्यासमान समजतात. तुमच्या देशांत बरेच प्रॉब्लेम्स आहेत. तसे आमच्या देशात पण आहेत. म्हणून आपण आपला देश वाईट ठरवायचा कां?” हा अमेरीकन माणुस स्टॅनफोर्ड या प्रसिध्ध विद्यापिठातील नोबेल पारितोषीक विजेता प्रोफेसर होता.अशाच एका थोर अमेरीकन विद्वानाची गाठ पडली. त्याला भारताविषयी फार जिव्हाळा आहे. त्याने सांगीतले, “तुम्ही भारतीय लोक एक चुक नेहमी करत असता. तुम्ही भारताची तुलना नेहमी इग्लंड, अमेरिकेशी करत असता. पण या देशांना स्वातंत्रय मिळुन 200 वर्षे होऊन गेली आहेत. तुमच्या देशाला स्वातंत्रय मिळुन फक्त 60 वर्षे झाली आहेत. त्यामुळे तुमच्या देशाची तुलना आमच्या देशाबरोबर करणे म्हणजे 10 वर्षांच्या मुलाची तुलना 30 वर्षांच्या माणसाबरोबर करण्यासारखे आहे.”
भारतातील आत्ताच्या अनागोंदिबद्दल ते म्हणतात, “तुम्ही लोकांनी एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. भारताला स्वातंत्रय मिळाल्यावर जी मंडळी सत्तेवर आली त्यांना ऍडमिनिस्ट्रेशनचा म्हणजे राज्यकारभाराचा कोणताही अनुभव नव्हता. हा जॉबच त्यांच्यासाठी नवीन होता. अमेरिकेचा प्रेसीडेन्ट असो किंवा ब्रीटनचा प्राइम मिनिस्टर असो, त्यांना थोडा- फार तरी ऍडमिनिस्ट्रेशनचा अनुभव असतो. पण अनुभव नसताना सुध्धा सत्तेवर आलेल्या लोकांनी उत्तम कारभार केला. लोकशाही नुसतीच रुजवली नाही तर बळकट केली. तुमचा भारत देश हा मिनी यूरोप सारखा आहे. भारतातील एका राज्यातुन दुसर्‍या राज्यात जाणे म्हणजे युरोपातील एका देशातुन दुसर्‍या देशात जाण्यासारखे आहे. युरोपमधे देश बदलला तर नुसतीच भाषा किंवा संस्कृती बदलत नाही तर सरकार, नियम, चलन सगळेच बदललते ( त्या वेळी युरो आस्तित्वात नव्हते ). पण भारतात तसे नाही. राज्य बदलल्यावर भले भाषा बदलत असेल. पण देश बदलत नाही. एव्हढी विवीधता असुनही तुमचा देश अजुनही एकसंध आहे हीच आमच्या द्रृष्टिने मोठी कौतुकाची गोष्ट आहे. युरोपीयन लोकांना हे अजुन जमलेले नाही. आता भारतामधे सत्तेवर येणार्‍या लोकांमधे ऍडमिनिस्ट्रेशनचा अनुभव असलेले जास्त लोक येणे आवश्यक आहे. या ठिकाणी मतदारांनी उमेदवार निवडुन देताना योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे.”
अमेरीकेतील एक प्रसीध्ध सिनेटर आहेत. ते भारत द्वेष्टे म्हणुनच प्रासिध्ध आहेत. त्यांची नुकतीच एक मुलाखत वाचायला मिळाली. त्यात त्यांनी म्हटले आहे, “ भारतापुढे आज जी संकटे आहेत. आणि ज्या संकटांचा भारताला सामना करावा लगला, ती सगळी संकटे “एकमेवद्वितीय ( Unique ) आहेत.जगातील कोणत्याच देशाने अशा प्रकारच्या समस्यांना तोंड दिलेले नाही. त्यामुळे या समस्यांना रेडीमेड सोल्युशन्स मीळणार नाहीत. भारतियांनाच या समस्यांवर तोडगा शोधुन काढावा लागेल. माझी खात्री आहे की भारतातील लोक यामधे यशस्वी होतील. येव्हडे असुनही भारताने जी प्रागती केली आहे ती खरोखरच कौतुकस्पद आहे.” हल्ली ते भारताविषयी बरेच चांगले बोलत असतात.असाच एक अमेरीकन इंजिनीयर भेटला. तो कांही वर्षे भारतात राहुन गेला आहे. भारतामधे प्रात्येक गोष्ट सरकारने करावी अशी भावना अहे त्याबद्दल त्याने भावना व्यक्त केली, “तुमच्या देशामधे सरकारने प्रत्येक गोष्ट करावी अशी लोकांची अपेक्षा आहे. थोडक्यात तुम्ही लोक सरकारवर फार अवलंबुन आहात. आमच्याकडे असे नाही. आम्ही कमीत कमी सरकारवर अवलंबुन असतो. पुष्कळशा गोष्टी आमच्या आम्ही करत असतो. तुम्हाला आमच्याकडे जी शिस्त, उच्च दर्जाची सार्वजनीक स्वच्छता, वाहतुकिच्या नियमांचे उत्तम पालन, व्यवहारात प्रामाणीकपणा व पारदर्शीपणा , करप्शन नसणे या ज्या गोष्टी दिसतात त्या सरकारने कडक कायदे केले म्हणुन दीसत नाहीत. उलट आमच्या सरकारचे म्हणणे आहे की कायदे करुन किंवा कायद्याचा बडगा दाखवुन लोकांना शिस्त लावता येत नसते. उलट लोकांनी आपणहुन कायदे कानुन पाळले तरच ते उपयुक्त ठरतात. आम्हाला लहानपणापसुनच कायदे हे आमच्या फायद्यासाठी व संरक्षणासाठी केले आहेत, तसेच नगरीक म्हणून आमची काही कर्तव्ये असतात हे मनावर ठसवले जाते.”
मी मुद्दमुनच अमेरीकन लोकांचे उदाहरण दिले आहे. कारण अमेरिकेसारख्या प्रागत राष्ट्रातील लोक भारताकडे कोणत्या नजरेने बघत असतात आणि आपण कोणत्या नजरेने बघत असतो हे कळावे म्हाणून.येत्या 15 ऑगस्ट रोजी भारताला स्‍वातंत्रय मिळुन 69 वर्षे होत आहे. त्यानिमित्त आपण आपल्या देशावीषयी काय विचार करत असतो याचा आढावा घेणे जरुरिचे आहे. आपला देश कसाही वेडावाकडा असला तरी तो आपला देश आहे. आपल्या देशाने आपल्यासाठी काय केले यापेक्षा आपण आपल्या देशासाठी काय केले व काय करु शकतो याचा विचार करणे जास्त आवश्यक आहे. सरकारने काय करायचे यापेक्षा मी रस्यात थुंकायची, रस्यात घाण किंवा कचरा टाकण्याची,बेशिस्त वागण्याची, वाहतुकिचे नियम तोडण्याची, पकडले गेल्यास पोलिसाला चिरिमिरी देउन सुटका करुन घेउन करप्शनला बढावा देण्याची, इतरांशी उध्धटपणे वागायची, संधी मिळेल तेव्हा डल्ला मारायची माझी सवय केव्हा मोडणार? आपणच घाण करायची आणि ती उचलायला सरकारी माणुस येइल याची वाट बघायची. नाहीतर परदेशी पलायन करायचा विचार करायचा. असे हे किती दिवस चालणार? याचा आता गंभीरपणे विचार करण्याची वेळ आली आहे. आज अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, जपान, कॅनडा, कोरिया, तैवान, सिंगापुर, ऑस्ट्रेलिया या राष्ट्रांनी जी प्रागती केली आहे ती तिथल्या जनतेने केली आहे, सरकारने नाही, हे लक्षात घेतले पाहिजे.प्रगत भारत निर्माण करणे हे आपल्या हातात आहे, सरकारच्या नाही याची जाणीव होणे आवश्यक आहे. आणि सरकार म्हणजे कोण? ते कोणी परग्राहावरुन आलेले लोक नाहीत. ते आपल्यातीलच लोक आहेत. याचे भान ज्याचे त्याने ठेवावे हीच अपेक्षा.चला तर! आपण सगळे मिळुन प्रगत भारत निर्माण करुया! !