Wednesday, December 30, 2020

सद्दाम हुसैन यांना फाशी दिल्यानंतर 'त्या' 12 अमेरिकन सैनिकांना का कोसळलं रडू?

सद्दाम हुसैन यांना फाशी दिल्यानंतर 'त्या' 12 अमेरिकन सैनिकांना का कोसळलं रडू?

  • रेहान फझल
  • बीबीसी प्रतिनिधी
सद्दाम हुसैन

सद्दाम हुसैनना 30 डिसेंबर 2006 साली फाशी देण्यात आली. सद्दाम हुसैन यांच्या सुरक्षेसाठी बारा अमेरिकन सैनिक तैनात करण्यात आले होते.

हे बारा सैनिक त्यांचे आयुष्यभराचे मित्र झाले नाहीत, पण त्यांचे शेवटच्या काळातले सोबती नक्की होते.

सद्दाम यांच्या शेवटच्या क्षणापर्यंत सोबत असलेल्या 551 मिलिट्री पोलिस कंपनीतून निवडल्या गेलेल्या सैनिकांना 'सुपर ट्वेल्ह्व' म्हणून ओळखलं जायचं.

या बारा सैनिकांपैकी एक असलेल्या विल बार्डेनवर्पर यांनी एक पुस्तक लिहिलं आहे. 'द प्रिझनर इन हिज पॅलेस, हिज अमेरिकन गार्ड्स, अँड व्हॉट हिस्ट्री लेफ्ट अनसेड' नावाच्या पुस्तकात त्यांनी सद्दाम हुसैन यांच्या शेवटच्या दिवसांबद्दलची माहिती दिली.

विल बार्डेनवर्पर
फोटो कॅप्शन,

विल बार्डेनवर्पर

सद्दाम हुसैन यांना फाशी देणाऱ्या लोकांच्या ताब्यात दिल्यानंतर सद्दाम यांच्या सुरक्षेसाठी तैनात केलेल्या सर्व सैनिकांच्या डोळ्यात अश्रू आले होते, असं बार्डेनवर्पर यांनी म्हटलं आहे.

'सद्दाम आजोबांसारखेच वाटायचे'

बार्डेनवर्पर यांनी अॅडम रोजरसन या आपल्या साथीदाराचा हवाला देऊन लिहिलं आहे, "आम्ही सद्दाम यांना कधीच मनोविकृत मारेकरी म्हणून पाहिलं नाही. ते आम्हाला आमच्या आजोबांप्रमाणे वाटायचे."

सद्दाम यांच्यावर आपल्या 148 विरोधकांच्या हत्येचा आदेश देण्याबद्दल खटला चालविण्यात आला होता.

सद्दाम यांचे शेवटचे दिवस हे इराकमधील तुरूंगात अमेरिकन गायिका मेरी जे ब्लाइजा यांची गाणी ऐकण्यात गेले. त्यांना त्यांच्या एक्सरसाइज बाइकवर बसायला आवडायचं. ते या बाइकला 'पोनी' म्हणायचे.

त्यांना गोड खायला खूप आवडायचं. मफिन्स खाण्यासाठी ते नेहमी तयार असायचे.

बार्डेनवर्पर यांनी लिहिलं आहे की, शेवटच्या दिवसात सद्दाम यांचं त्यांच्यासोबतचं वागणं खूप नम्र होतं. सद्दाम त्यांच्या काळातील सर्वांत क्रूर शासक होते, असं जराही त्यांच्या वर्तनातून जाणवायचं नाही.

कॅस्ट्रोनं शिकवलं होतं सिगार ओढायला

सद्दाम यांना 'कोहिबा' सिगार पिण्याचा शौक होता. वेट वाइप्सच्या डब्यात ते या सिगार ठेवायचे.

अनेक वर्षांपूर्वी फिडेल कॅस्ट्रोनं आपल्याला सिगार ओढायला शिकवलं असल्याचं सद्दाम सांगायचे.

फिडेल कॅस्ट्रो आणि सद्दाम हुसैन
फोटो कॅप्शन,

फिडेल कॅस्ट्रो आणि सद्दाम हुसैन

बार्डेनवर्पर यांनी लिहिलं आहे की, सद्दाम यांना बागकामाची खूप आवड होती आणि ते तुरुंग परिसरात उगवलेल्या झाडाझुडपांनाही एखाद्या सुंदर फुलाप्रमाणेच पहायचे.

सद्दाम त्यांच्या खाण्यापिण्याबद्दल अतिशय संवेदनशील होते.

नाश्त्यामध्ये ते आधी ऑमलेट खायचे. मग मफिन आणि त्यानंतर एखादं ताजं फळ. चुकूनही जर त्यांचं ऑमलेट तुटलं, तर ते खायला नकार द्यायचे.

बार्डेनवर्पर लिहितात की, सद्दाम यांनी एकदा आपला मुलगा उदय याच्या क्रूरतेचा एक किस्सा सांगितला होता. उदय याच्या त्या कृत्यामुळे सद्दाम प्रचंड संतापले होते.

उदय यानं एका पार्टीत गोळीबार केला होता. त्यामध्ये अनेक लोक मारले गेले होते तसंच जखमी झाले होते. यामुळे सद्दाम इतके नाराज झाले की, त्यांनी उदयच्या सगळ्या गाड्यांना आग लावण्याची आज्ञा केली.

उदयच्या महागड्या रोल्स रॉइस, फेरारी, पोर्शसारख्या महागड्या गाड्यांना कशी आग लावून देण्यात आली हे सद्दाम मोठमोठ्यानं हसून सांगत होते.

भावनाशील सद्दाम

सद्दाम यांच्या सुरक्षेमध्ये तैनात असलेल्या एका अमेरिकन सैनिकानं त्यांना सांगितलं की, त्याच्या भावाचा मृत्यू झाला आहे. हे ऐकल्यावर सद्दाम यांनी त्याला मिठी मारली आणि म्हटलं, "आजपासून तू मला तुझा भाऊ समज."

सद्दाम यांनी त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या अजून एका सैनिकाशी बोलताना म्हटलं होतं की, जर मला माझे पैसे वापरण्याची परवानगी मिळाली तर मी तुझ्या मुलाच्या कॉलेज शिक्षणाचा खर्च उचलायला तयार आहे.

सद्दाम हुसैन

एका रात्री सगळ्यांनी पाहिलं की, डॉसन नावाचा वीस वर्षांचा एक सैनिक ढगळा होणारा सूट घालून फिरत होता. सद्दाम यांनी आपला सूट डॉसनला भेट म्हणून दिला होता.

बार्डेनवर्पर यांनी लिहिलं आहे, "आम्ही खूप दिवस डॉसनला हसायचो. कारण तो सूट घालून डॉसन एखाद्या फॅशन शोमध्ये कॅटवॉक करत असल्याच्या ऐटीत फिरत होता."

सद्दाम आणि त्यांच्या सुरक्षा रक्षकांची मैत्री होत होती. अर्थात, सद्दाम यांच्या फार जवळ न जाण्याच्या त्यांना स्पष्ट सूचना होत्या.

सद्दाम यांच्यावरील खटल्यांच्या दरम्यान त्यांना दोन तुरुंगात ठेवण्यात आलं होतं.

एक बगदादमधील आंतरराष्ट्रीय लवादाचं तळघर होतं आणि दुसरा उत्तर बगदादमधला त्यांचा महाल होता, जो एका बेटावर होता. तिथपर्यंत एका पुलावरून जावं लागायचं.

बार्डेनवर्पर लिहितात, "आम्ही सद्दाम यांना आवश्यकतेपेक्षा जास्त काहीच दिलं नाही. पण त्यांच्या स्वाभिमानाला कधीच धक्का पोहोचवला नाही."

स्टीव्ह हचिंसन, क्रिस टास्कर आणि दुसऱ्या सुरक्षा रक्षकांनी स्टोअर रुमला सद्दाम यांच्या कार्यालयाचं स्वरुप देण्याचाही प्रयत्न केला होता.

सद्दाम यांचा 'दरबार' भरविण्याचा प्रयत्न

सद्दाम यांना 'सरप्राइज' देण्याची योजना आखण्यात आली. अडगळीच्या खोलीतून एक छोटा टेबल आणि चामड्याचं कव्हर असलेली खुर्ची बाहेर काढली. टेबलावर इराकचा छोटा झेंडा ठेवण्यात आला.

सद्दाम हुसैन

बार्डेनवर्पर लिहितात, "या सगळ्याच्या मागे हा विचार होता की, आम्ही तुरूंगातही सद्दाम यांच्यासाठी शासनप्रमुखाच्या कार्यालयासारखं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहोत. सद्दाम जेव्हा पहिल्यांदा त्या कार्यालयात आले, तेव्हा एका सैनिकानं पटकन झुकून टेबलावरची धूळ झटकून साफ केली.

सद्दाम यांनी या कृतीची दखल घेतली आणि खुर्चीवर बसून हसले.

सद्दाम रोज येऊन त्या खुर्चीवर बसायचे आणि त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेले सैनिक त्यांच्या समोर ठेवलेल्या खुर्च्यांवर बसायचे. जणूकाही सद्दाम यांचा दरबार भरला आहे असं वातावरण निर्माण व्हायचं.

बार्डेनवर्पर सांगतात की, सद्दाम यांना खूश ठेवण्याचा सैनिकांचा प्रयत्न असायचा. सद्दामही त्यांच्यासोबत चेष्टामस्करी करायचे. वातावरण आनंदी राहायचं.

सद्दाम यांना जेव्हा संधी मिळायची तेव्हा ते आपल्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या सैनिकांच्या कुटुंबीयांची चौकशी करायचे.

या पुस्तकातला सर्वांत आश्चर्यचकित करणारा किस्सा म्हणजे सद्दाम हुसैन यांच्या मृत्यूनंतर या सैनिकांनी शोक व्यक्त केला होता. सद्दाम हे अमेरिकेचे कट्टर शत्रू समजले जायचे, त्यामुळेच या सैनिकांची ही कृती चकित करणारी होती.

पुस्तकाचं कव्हर

त्या सैनिकांपैकी एक होते अॅडम रॉजरसन. त्यांनी विल बार्डेनवर्पर यांच्याशी बोलताना म्हटलं होतं की, सद्दाम यांना फाशी दिल्यानंतर आम्हाला त्यांच्याशी विश्वासघात केल्यासारखं वाटलं होतं. आम्ही स्वतःलाच त्यांचे मारेकरी समजत होतो. आमच्या खूप जवळच्या व्यक्तिला मारल्याप्रमाणे आम्हाला वाटत होतं.

सद्दाम यांना फाशी दिल्यानंतर त्यांचा मृतदेह बाहेर आणण्यात आला. त्यावेळी तिथे उभे असलेले लोक त्यांच्या मृतदेहावर थुंकले.

अमेरिकन सैनिकांना वाटलं आश्चर्य

बार्डेनवर्पर लिहितात, "हे पाहून सद्दाम यांची शेवटच्या क्षणापर्यंत सुरक्षा करणारे 12 सैनिक आश्चर्यचकित झाले."

त्यांच्यापैकी एकानं जमलेल्या गर्दीसोबत दोन हात करण्याचाही प्रयत्न केला, पण त्याच्या साथीदारांनी त्याला मागे खेचून घेतलं.

या सैनिकांपैकी एक असलेल्या स्टीव्ह हचिन्सन यांनी सद्दामला फाशी दिल्यानंतर अमेरिकेच्या लष्करातून राजीनामा दिला होता.

हचिसन्स 2017 पर्यंत जॉर्जियामध्ये बंदुका आणि टेक्निकल ट्रेनिंगचा व्यवसाय करत होते. सद्दाम हुसैन यांच्या मृतदेहाचा अपमान करणाऱ्या इराकी नागरिकांसोबत संघर्ष न करण्याचे आदेश मिळाले असल्याचा त्यांना खेद वाटतो.

आपल्याला फाशी होणार नाही, अशी सद्दाम यांना शेवटच्या क्षणापर्यंत आशा होती.

अॅडम रोझरसन नावाच्या सैनिकाने बार्डेनवर्पर यांना सद्दाम यांच्याशी झालेला संवाद सांगितला होता. तुरुंगातून सुटल्यावर पुन्हा एकदा लग्न करण्याची इच्छा सद्दाम यांनी व्यक्त केली होती.

सद्दाम हुसैन

30 डिसेंबर 2006 रोजी सद्दाम यांना पहाटे तीन वाजता उठविण्यात आलं.

थोड्या वेळात फाशी देण्यात येईल, असं सद्दाम यांना सांगितलं. हे ऐकल्यावर सद्दाम यांना आतमध्ये काहीतरी तुटल्याची जाणीव झाली. त्यांनी शांतपणे आंघोळ केली आणि फाशीला सामोरं जायला स्वतःला तयार केलं.

आपल्या फाशीच्या काही मिनिट आधी सद्दाम यांनी स्टीव्ह हचिन्सन यांना आपल्या तुरुंगाच्या कोठडीबाहेर बोलावलं. आपल्या मनगटावरचं 'रेमंड व्हील' घड्याळ त्यांनी हचिन्सनला दिलं.

हचिन्सननं विरोध केला तेव्हा सद्दाम यांनी स्वतःच्या हातानं ते घड्याळ त्यांच्या मनगटावर बांधलं. हचिन्सन यांच्या जॉर्जियामधल्या घरातल्या कपाटावर ते घड्याळ अजूनही टिकटिक करताना दिसतं.

Wednesday, November 18, 2020

! ! यह भी कट जाएगा ! !

https://t.me/joinchat/OZf-IEreYV3UnTsReSFeNA

*✍🏻“हर चीज का हल होता है,आज नहीं तो कल होता है”....*

*✍️एक बार एक राजा की सेवा से प्रसन्न होकर एक साधू नें उसे एक ताबीज दिया और कहा की राजन  इसे अपने गले मे डाल लो और जिंदगी में कभी ऐसी परिस्थिति आये की जब तुम्हे लगे की बस अब तो सब ख़तम होने वाला है ,परेशानी के भंवर मे अपने को फंसा पाओ ,कोई प्रकाश की किरण नजर ना आ रही हो ,हर तरफ निराशा और हताशा हो तब तुम इस ताबीज को खोल कर इसमें रखे कागज़ को पढ़ना ,उससे पहले नहीं!*

*राजा ने वह ताबीज अपने गले मे पहन लिया !एक बार राजा अपने सैनिकों के साथ शिकार करने घने जंगल मे गया!  एक शेर का पीछा करते करते राजा अपने सैनिकों से अलग हो गया और दुश्मन राजा की सीमा मे प्रवेश कर गया,घना जंगल और सांझ का समय ,  तभी कुछ दुश्मन सैनिकों के घोड़ों की टापों की आवाज राजा को आई और उसने भी अपने घोड़े को एड लगाई,  राजा आगे आगे दुश्मन सैनिक पीछे पीछे!   बहुत दूर तक भागने पर भी राजा उन सैनिकों से पीछा नहीं छुडा पाया !  भूख  प्यास से बेहाल राजा को तभी घने पेड़ों के बीच मे एक गुफा सी दिखी ,उसने तुरंत स्वयं और घोड़े को उस गुफा की आड़ मे छुपा लिया !  और सांस रोक कर बैठ गया , दुश्मन के घोड़ों के पैरों की आवाज धीरे धीरे पास आने लगी !  दुश्मनों से घिरे हुए अकेले राजा को अपना अंत नजर आने लगा ,उसे लगा की बस कुछ ही क्षणों में दुश्मन उसे पकड़ कर मौत के घाट उतार देंगे !  वो जिंदगी से निराश हो ही गया था , की उसका हाथ अपने ताबीज पर गया और उसे साधू की बात याद आ गई !उसने तुरंत ताबीज को खोल कर कागज को बाहर निकाला और पढ़ा !   उस पर्ची पर लिखा था —“यह भी कट जाएगा “*

*राजा को अचानक  ही जैसे घोर अन्धकार मे एक  ज्योति की किरण दिखी , डूबते को जैसे कोई सहारा मिला !  उसे अचानक अपनी आत्मा मे एक अकथनीय शान्ति का अनुभव हुआ !  उसे लगा की सचमुच यह भयावह समय भी कट ही जाएगा ,फिर मे क्यों चिंतित होऊं !  अपने प्रभु और अपने पर विश्वासरख उसने स्वयं से कहा की हाँ ,यह भी कट जाएगा !*

*और हुआ भी यही ,दुश्मन के घोड़ों के पैरों की आवाज पास आते आते दूर जाने लगी ,कुछ समय बाद वहां शांति छा गई !  राजा रात मे गुफा से निकला और किसी तरह अपने राज्य मे वापस आ गया !*

*🤏🏻दोस्तों,यह सिर्फ किसी राजा की कहानी नहीं है यह हम सब की कहानी है !हम सभी परिस्थिति,काम ,तनाव के दवाव में इतने जकड जाते हैं की हमे कुछ सूझता नहीं है ,हमारा डर हम पर हावी होने लगता है ,कोई रास्ता ,समाधान दूर दूर तक नजर नहीं आता ,लगने लगता है की बस, अब सब ख़तम ,है ना?*

*जब ऐसा हो तो २ मिनट शांति से बेठिये ,थोड़ी गहरी गहरी साँसे लीजिये !  अपने आराध्य को याद कीजिये और स्वयं से जोर से कहिये –यह भी कट जाएगा !   आप देखिएगा एकदम से जादू सा महसूस होगा , और आप उस परिस्थिति से उबरने की शक्ति अपने अन्दर महसूस करेंगे !  आजमाया हुआ है ! बहुत कारगर है !*

*👉आशा है जैसे यह सूत्र मेरे जीवन मे मुझे प्रेरणा देता है ,आपके जीवन मे भी प्रेरणादायक सिद्ध होगा🙏🏻*

Thursday, November 12, 2020

उपयोगी नारळ तेल

 प्राचीन चिनी औषधानुसार पायाखाली सुमारे 100 एक्युप्रेशर पॉइंट असतात.

ते अवयव दाबून आणि मालिश करून अनेक आजार देखील बरे होतात.

यालाच फूट रिफ्लेक्सोलॉजी असे म्हणतात…

  • एका दक्षिण भारतीय महिलेने सांगितले माझ्या आजोबांचे वयाच्या 87 व्या वर्षी निधन झाले, पाठदुखी नाही, सांधेदुखी नाही, डोकेदुखी नाही, दात दुःखी नाही, एकदा त्यानी सांगितले की मंगलोरमध्ये राहत असताना त्याना एक म्हातारा भेटला. झोपताना तो पायाच्या तळांवर तेल लावण्यासाठी त्यांनी त्याना सल्ला दिला होता. आणि तेंव्हापासून हा उपचार त्यांचा स्वास्थ्याचा एकमेव स्त्रोत आहे. त्यामुळे त्याना कधीही कोणताही त्रास झाला नाही.
  • मणिपाल येथील एका विद्यार्थ्याने सांगितले की माझ्या आईने माझ्या पायाखाली नारळ तेल लावण्याचा आग्रह धरला. तो म्हणाला की लहान असताना त्याची दृष्टी क्षीण झाली होती. जेव्हा तिने ही प्रक्रिया सुरू केली व त्या नंतर त्याच्या डोळ्याचा प्रकाश हळूहळू पूर्णपणे आणि आरोग्यासाठी चांगला झाला.
  • उडुपी येथील एक गृहस्थ श्री. कामत जे व्यापारी आहेत त्यानी सांगितले की मी सुट्टीसाठी केरळला गेलो होतो.तेथील एका हॉटेलच्या Room मध्ये मला झोप येत नव्हती मी उठून बाहेर फेर फटका मारु लागलो, रात्री बाहेर बसलेला म्हातारा पहारेकरी मला विचारू लागला, "काय झाले साहेब ?" मी म्हणालो मला झोप येत नाही! तो हसला आणि म्हणाला, "तुमच्या कडे नारळ तेल आहे का?" मी म्हणालो नाही, तो जाऊन नारळ तेल घेऊन आला आणि म्हणाला, "आपल्या पायाच्या तळव्याना काही मिनिटे मालिश करा." मग मात्र मी शांत झोपलो.
  • रात्री झोपण्यापूर्वी पायांच्या तळव्यावर नारळ तेलाने मालिश केल्यास अधिक शांत झोप लागते आणि थकवा कमी होतो .

मी माझ्या लहान मुलिच्या पायाच्या तळांवर नारळ तेलाने मालिश करतो, जे तिला खूप आनंदी आणि निरोगी ठेवते.

  • पाय दुखत असल्यास रात्री झोपायला जाण्यापूर्वी दररोज 2 मिनिटांसाठी नारळाच्या तेलाने पायांच्या तळांची मालिश करा. या प्रक्रियेमुळे पायाच्या दुखण्या पासुन त्वरित आराम मिळेल.
  • पायावर सूज येत असल्यास देखिल मालिश करणे गुणकारी ठरते.
  • छान झोप घेण्यासाठी झोपेच्या गोळ्यांपेक्षा ही टीप चांगली आहे.
  • थायरॉइड पायाची जळजळ यावर रामबाण उपाय म्हणजे रोज रात्री झोपताना पायाच्या तळाला मालिश करणे.
  • मुळव्याध गुडघादुखी पाठदुखी यावर देखिल रामबाण उपाय म्हणजे तळव्यांची मालिश करणे.

आपणास फक्त कॉकॉनट ऑईलच संपूर्ण पायांवर लावायचे आहे..

विशेषत:डाव्या तळव्यांवर तीन मिनिटे आणि उजव्या पायाच्या तळव्यावर तीन मिनिटे..

झोपेच्या वेळी पायांच्या तळांवर मालिश करणे सुरू करा आणि त्याच प्रकारे मुलांचा सुद्धा पायावर मालिश करा आयुष्यभर याचा एक नित्य कर्म बनवा नंतर निसर्गाची परिपूर्णता पहा तुम्ही आयुष्यभर अनेक आरोग्यदायी फायदे अनुभवू शकता.

Tuesday, November 10, 2020

रामायणानुसार जटायू हा गरुड जातीचा एक पक्षी होता. कश्यप ऋषींची पत्नी विनिता हिच्या पासून गरुड आणि अरुण असे दोन पुत्र झाले होते, अशी कथा पुराणात आहे. गरुडाचा भाऊ आणि सुर्य देव यांचा सारथी अरुण व त्याची पत्‍नी अरुणा यांना जटायू आणि संपाती अशी दोन पुत्र होती.

छायाचित्र : गुगल

या दोघांनी पण विंध्याचल पर्वताच्या पायथ्याशी आश्रम असणाऱ्या ऋषी निशाकर यांची खुप सेवा केली. या ऋषींनी त्यांना संपूर्ण दण्डकरण्यावर पहारा देऊन दण्डकरण्याचे रक्षण करा असे सांगितले होते.

एकदा इक्ष्वाकुकुलीन अयोध्याचा राजा दशरथ हे शिकारी साठी दण्डकरण्यात फिरत होते. त्यावेळेस जटायूने आपण या अरण्यात शिकार करू नये असे सांगितले. तेव्हा राजा दशरथाने मी अयोध्याचा राजा दशरथ आहे , अशी ओळख दिल्याने जटायूला खुप आनंद झाला . त्यानंतर जटायू हा राजा दशरथ यांचा परम मित्र झाला.
ज्या वेळेस रावणाचा मामा मारीच याने मायावी सुवर्ण मृगाचे रूप धारण करून राम आणि लक्ष्मण यांना आपल्या पर्णकुटी पासून दूर अरण्यात नेले. रामाने त्याचा वध केला, त्याच वेळेस रावणाने भिक्षुक गोसावी रूप घेऊन सीतेस आपल्या पुष्पक विमानातून पळवून नेत असताना त्यास रोखण्याचा प्रयत्‍न जटायूने केला. शेवटी पण रावणाने तलवारीने त्याचे पंख छाटून टाकले व त्याला जखमी अवस्थेत सोडुन दिले.

छायाचित्र : गुगल

जटायू बद्दल अजुन एक माहिती मिळते. बीड शहरातील जटाशंकर मंदिराचा संबंध थेट रामायणाशी जोडणाऱ्या दंतकथा प्रचलित आहेत.
रामायणानुसार, रावण हा रामपत्नी सीतेस पुष्पक विमानातून पळवून नेत असताना त्यास रोखण्याचा प्रयत्‍न जटायू नावाच्या गरुडाने केला, पण रावणाने तलवारीने त्याचे पंख छाटून टाकले. मृत्यूला कवटाळताना त्याने रामाला ही हकीकत सांगितली. जटायूची आठवण म्हणून बीडमधल्या त्या जागी, देवगिरीच्या यादवांच्या काळात जटाशंकर मंदिर बांधले आहे, असे म्हणतात.

जटायू हा गरुड होता की गिधाड यात मतभेद आहे.

काही अभ्यास कांनी तर जटायू हा पक्षी होता यावरच शंका उपस्थित केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार जटायू हा पक्षी नसून गिधाडांसारखा दिसणाऱ्या पिसांचा मुखवटा व पंख लावणारा गृध्र टोळीतील एक मनुष्यच होता.

हे दोनही पक्षी आज पण अस्तित्वात आहे, असे आपण म्हणु शकतो.

स्रोत :-
जटायू (रामायण) - विकिपीडिया

वाल्मीकि रामायण, किष्किंधा कांड 

एकलव्याला गुरुदक्षिणा म्हणून आपला अंगठा द्यावा लागला.

 

 जुन्या काळापासून मागासवर्गीयांवर अन्याय झाला, असं वाटत नाही का?


हा अत्यंत चुकीचा जातीयवादी प्रचार आहे. ऐतिहासिक वास्तव वेगळे आहे. एकलव्याचे वडील हिरण्यधनू (ज्याने सोने लुटण्यासाठी धनुष्य हातात घेतलेले आहे असा त्याचा अर्थ) ते वाटमारी करणारे लुटारु होते. तोच उद्योग मुलगा पुढे चालविणार म्हणून धनुर्विद्येचा समाजविघातक दुरुपयोग होऊ नये या साठी द्रोणाचार्यांनी त्या विद्या शिकविण्यास नकार दिला होता. परंतू त्याने जिद्दीने व निष्ठेने विद्या आत्मसात् केली व स्वतःला द्रोणाचार्यांचा शिष्य म्हणवून घेत असे. त्यावर निर्बंध राहावेत म्हणून द्रोणाचार्यांनी अंगठ्याचा उपयोग करणार नाही असे त्याचे कडून वचन घेतले होते. अंगठा कापून नव्हता घेतला. महाभारत युध्दात तो कौरवांकडून लढला व त्यांत त्याचा रणभूमीवर मृत्यु झाला. मूळ महाभारत वाचा म्हणजे कळेल. उगीच जातीय तेढ निर्माण करणारे विचार व खोट्या गोष्टी इंग्रजांनी फोडा व झोडा ह्या नीतीने पसरविले. जातीयतेमुळे आपण आपलेच नुकसान करुन घेत आहोत व देशाचा घात करीत आहोत. जाती विरहित समाज घडवून नवीन युगाची सुरुवात केली तरच आपली प्रगती होईल. जुने उगाळत तेढ निर्माण करणे थांबविणे गरजेचे आहे.

Friday, October 30, 2020

विदर्भ दर्शन

*💪विदर्भातील आश्चर्य :💪*


*व-हाडी मंडळी, तुम्ही किती बघीतले*?


*1) लोणार सरोवर*
लोणार, बुलढाणा - हे सरोवर उल्कापातामुळे तयार झालेले असून सरोवराचे पाणी खारे आहे.

*2) हनुमान मुर्ती*
नांदुरा, बुलढाणा - 105 फुट उंच हनुमान मुर्ती 

*3) कचरगड गुफा*
दरेकसा, गोंदिया - ही आशिया खंडातील सर्वात मोठी नैसर्गिक गुफा आहे.

*4) डायमंड रेल्वे क्रॉसिंग*
नागपूर - येथे भारतीय रेल्वे मार्ग चारही दिशेने जोडलेला आहे. 

*5) भव्य शिवलिंग*
चंद्रपूर - येथे एका मोकळ्या जागेत भव्य मुर्त्या पडून आहेत. 

*6) टिपागड तलाव*
कोरची, गडचिरोली - 3000 फुट उंचीवर असलेले टिपागड तलाव.

*7) अंतरिक्ष पार्श्वनाथ जैन मंदिर*
शिरपूर जैन, वाशिम - येथे महावीर जैन यांची मुर्ती हवेत तरंगत आहे. 

*8) झिरो माईल स्टोन*
नागपूर - भारताचा मध्य बिंदू

*9) चिंतामणी मंदिर*
कोथळी, बुलढाणा - येथे दोन शिवालये आहेत, सुर्योदय आणि सुर्यास्ताच्या वेळी येथील शिवलिंग सुर्यप्रकाशाने झळाळून निघतात. 

*10) महिमापूर विहीर*
महिमापूर, अमरावती - येथे वास्तूकलेचा उत्कृष्ट नमुना असलेली 7 मजली पायरी विहीर आहे.

*11) अश्मयुगीन गुफा*
मोर्शी, अमरावती - या गुफेमध्ये अश्मयुगीन चित्रे काढलेली आहेत. 

*12) सुर्यमंदीर*
लासूर, अमरावती - 12 महिन्याचे 12 खांब आणि त्यावर वर्तुळाकार खुले छत हे मंदिर जणू वेधशाळाच आहे. 

*13) सप्तर्षी मंदिरे*
मेहकर, बुलढाणा - येथे 7 गावामध्ये 7 ऋषींचे मंदिरं आहेत. ज्यांना गुगल मॅप वरून बघितल्यास आकाशात दिसणार्या सप्तर्षी तार्यांप्रमाणे या मंदिरांची मांडणी आहे. 

*14) महादेव गुफा*
गव्हाणकुंड, अमरावती - येथे गुफेत असणा-या शिवलिंगावर 12 महिने सतत नैसर्गिक जलधारा कोसळत असतात. 

*15) शारंगधर बालाजी*
मेहकर, बुलढाणा - येथील बालाजी मुर्ती भव्य असून तीची उंची 11.2 फुट आहे.

*16) शमी विघ्नेश गणपती*
आदासा, नागपूर - येथील गणेश मुर्ती खूप विशाल असून तिची उंची 12 फुट आणि रूंदी 7 फूट आहे. 

*🙏सौजन्य:- विदर्भ दर्शन👌*

Monday, October 12, 2020

रौद्ररूप

"घरभाडे देता येणार नसेल तर...मला जे हवंय ते द्यावं लागेल..."
विकृत नजरेने घरमालक तिच्याकडे बघून तिच्याकडे पाहत होता...
संध्यापुढे आयुष्य म्हणजे एक संकट होतं... राहण्यापासून ते खाण्यापर्यंत... प्रत्येक ठिकाणी संघर्ष...
गरिबीत वाढलेली ती...लग्नही गरीब माणसाशीच झालं...शहरात काम मिळेल या आशेने दोघेही काम शोधायला मुंबई ला आले...घरभाड्याच्या तक्रारी मुळे कित्येकदा त्यांना खोली बदलावी लागे...
"अहो...कंटाळा आलाय आता सारखं सारखं घर बदलून...आपली स्वतःची एक खोली असती तर किती बरं झालं असतं ना?"
"होईल लवकरच...मला एक काम मिळालं आहे...पण 15-15 दिवस बाहेर राहावं लागेल..."
संध्या ला आनंदही झाला आणि सोबतच दुःखही... घरात 4 पैसे जास्त येणार म्हणून आणि नवरा लांब जाणार म्हणून..
तिचा नवरा निघून तर गेला.. पण हे 15 दिवस तिला खायला उठले. .कसेबसे दिवस काढत ती त्याची वाट पाहू लागली, पण त्याचा निरोप आला की तो अजून 2 महिने येणार नाही...

"संध्या...मला खरंच माफ कर, 2 महिने इथेच थांबावं लागेल...मलाही कल्पना नव्हती, पण आपल्या संसारासाठी....हे काम झालं ना, भरपूर पैसे मिळतील बघ"
"हरकत नाही...थांबा तुम्ही..मी राहीन इथे मजेत...माझी काळजी करू नका..."
संध्याने हो तर सांगितलं, पण जवळचे पैसे संपत चाललेले...घरमालक भाडं मागू लागला...तेव्हा पैसे नाहीये म्हणून त्यांचा घरातली सगळी कामं करून देण्याची बोली तिने केली...खोलीच्या भाड्याहुन जास्त असं काम तिच्याकडून करून घेण्यात आलं...
सकाळी उठल्यापासून ते झोपेपर्यंत तीला सतत कामं सांगून हैराण करत असत..एवढंच नाही तर तिला घालूनपाडून बोलत खूप त्रास दिला गेला..पण ती निमूटपणे सहन करत गेली..
संध्या ने मुद्दाम सांगायचं टाळलं, की ती पोटुशी आहे ते...नाहीतर तिचा नवरा उगाच काळजी करत बसेल, आल्यावर त्याला ही आनंदवार्ता देण्याचं ठरवलं...
2 महिन्यांनी तिचा नवरा परत आला...त्याने बऱ्यापैकी पैसे कमवून आणले, यावेळी संध्याची चांगली हौस मौज झाली..आयुष्यात पहिल्यांदा असा आनंद तिने अनुभवला...तिने नवऱ्याला आनंद वार्ता दिली,
"अहो तुम्ही वडील होणार आहात..."
"काय सांगतेस? संध्या...खूप खुश आहे मी...बाळाचाच पायगुण बघ...त्याची नुसती चाहूल लागताच आयुष्यात आनंद येऊ लागला बघ..."
9 महिने निघून गेले...मालकाकडे काम करून ती घरभाडे वाचवत होती, पण नवऱ्याला तिला होणारा जाच कधीच सांगितला नाही...मालक शिवीगाळ करायचा तेव्हा तिला रडू येई, पण संसारासाठी ती सहन करत गेली..
संध्या ची सुखरूप प्रसूती झाली...
बाळाचं करण्या सवरण्यात तिला वेळ पुरत नसे, त्यात घरमालक कडे काम करणं तिने बंद केलं...पैसे हाताशी आल्याने तिने घरभाडं द्यायचं सुरू केलं..
घरमालकाला आणि त्याच्या बायकोला आयत्या कामांची तिची सवय झालेली, त्यांच्या जीवावर आलं...त्यातच पुन्हा एकदा तिच्या नवऱ्याला2 महिने कामासाठी बोलावलं गेलं...दुसऱ्या महिन्याचं भाडं भरायला आता संध्या कडे पैसे नव्हते...आणि बाळामुळे घरकाम करायला जाणं तिला शक्य नव्हतं...घरमालकाला आयती संधी मिळाली..
"साहेब, एवढा महिना फक्त समजून घ्या... पुढच्या महिन्यात नक्की देईन.."
"भाडं देता येत नसेल तर...मला हवं ते देशील?"
घरमालक तिच्याजवळ एकेक पाऊल पुढे टाकत होता..
संध्याला त्याच्या वाईट हेतुची कल्पना आली..
"हे बघा साहेब, पैसे नाही म्हणून मी लाचार आहे..पण म्हणून ही असली थेरं जमणार नाही..आत्ताच्या आत्ता इथून चालते व्हा.."
संध्या असं बोलल्यावर मालक चिडला,
"ए...एक तर पैसे देत नाही...वर इतका माज..?"
संध्या चा गळा दाबत मालक अंगावर धावून येतो..
संध्या आपल्या झोपलेल्या बाळाकडे बघते आणि मालकाला एकच चपराक टाकते...हातात दांडा घेऊन मालकाला चांगलीच चोपते... आवाज ऐकून त्याची बायको आणि शेजारी धावून येतात...संध्या त्यांना सगळी हकीकत सांगते..मालक पुरता घाबरलेला असतो...सगळे मिळून त्याला अजून चोपतात...त्याची बायकोही चिडते..आणि संध्या चं असं रूप पाहून तीही घाबरते..

"पैसे पाहिजे काय...अरे नालायका... घरभाड्यातून जास्त काम तू करून घेतलंस माझ्याकडून... एक महिना थांब म्हटलं तर इतकी हिम्मत तुझी?"
"जोवर बाई म्हणून होते तोवर स्वतःसाठी सगळं सहन केलं... पण तू एका आईला डिवचलं...जेव्हा आई म्हणून बाई जन्म घेते तेव्हा वाईटाचा नाश करण्याइतपत सामर्थ्य तिच्यात निर्माण होतं. लक्षात ठेव, यापुढे कुठल्याही आईला डीवचायची हिम्मत करायची नाय..."
सर्वजण आई नावाच्या सामर्थ्यशाली बाईचं रौद्ररूप बघून अवाक झाले होते...